Nitin Gadkari : सध्या राज्यात सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात इंकमिंग सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगवर भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) आपले रोखठोक मत व्यक्त करत भाष्य केलं आहे. पक्षात होणाऱ्या जोरदार इंकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं सूचक वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील नेत्यांचे एकप्रकारे कान टोचले आहेत. ते नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेही उपस्थित होते.

Continues below advertisement

Nitin Gadkari on BJP : जुना कार्यकर्ता 'घर की मुर्गी दाल बराबर', तर बाहेला 'सावजी चिकम मसाला'

ना कार्यकर्ता हा "घर की मुर्गी दाल बराबर" तर बाहेरून आलेले "सावजी चिकम मसाला" जुना कार्यकर्ता हा "घर की मुर्गी दाल बराबर" तर बाहेरून आलेले "सावजी चिकम मसाला" असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाचा परिस्थितीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भाष्य केले. कळमेश्वर सावनेर भागात डॉ. राजीव पोतदार यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची आठवण करून देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर लक्ष द्यावे, असे गडकरी यावेळी म्हणाले. डॉ. राजीव पोतदार सारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला लाभला. त्यांना मी कायम सांगायचो दवाखान्याकडे लक्ष द्या, मात्र त्यांनी दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून जनतेची कामे करत राहिले. प्रामाणिकपणे कायम जनतेची सेवा हीच भाजपची शिकवण आहे. असेही नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

'कळमेश्वरमध्ये डॉ. पोतदारसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण बावनकुळे त्याकडे लक्ष देत नाही.."चांगला माणूस हा घरकी मुर्गी दाल बराबर असतो...." जुन्या लोकांकडे लक्ष द्या, हे माझा काळातले जुने कार्यकर्ते आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली, तर जेवढ्या जोराने वर चालले आहे. तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा. डॉ. राजीव पोतदार यांना नगर पालिका निवडणुकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे संधी देतील' असेही नितीन गडकरी म्हणाले.

Continues below advertisement

आणखी वाचा