Nana Patole : आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अनेकजण मागतात. मात्र, काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर, आपला सत्यानास होईल असे मत काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे. कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता कामा नये असेही ते म्हणाले. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर, त्याच्या घरात घुसून मारु, असा सज्जड दम देखील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

Continues below advertisement


आता काँग्रेसयुक्त भाजप झालीय


सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोरील त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर, त्याच्या घरात घुसून मारु, असा सज्जड दम नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. काँग्रेसमुक्त भारत करु अशा नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. त्यामुळं अनेक आलेत अनेक गेलेत मात्र काँग्रेस पक्ष संपू शकला नाही असं म्हणत नाना पटोलेंनी भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सज्जड दम दिला आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडाऱ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते. यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.


काँग्रेसचा तिरंगा भंडारा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही


जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानास होईल. समीकरण कसे जुळवायचे हे सभा आणि सर्वेच्या आधारावर ठरणार. कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता कामा नये असेही पटोले म्हणाले. सगळेजण सांगतात की मला तिकीट झाली. मी सातत्यानं सांगतोय अजूनही कुणाला तिकीट झालेली नाही. काही लोकांच्या डोक्यात असेल तर ते काढलं पाहिजे. मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी समजू नका. अनेक आलेत...अनेक गेलेत... काँग्रेस पक्ष संपू शकत नाही. ज्या मोदींनी आणि भाजपने सांगितलं की आम्ही काँग्रेसमुक्त भारत करु, त्यात आता उलटं काँग्रेसचे लोक भाजपमध्ये गेले आणि आता भाजपयुक्त काँग्रेस झाली आहे. पण, महाराष्ट्र, भारत आणि भंडाऱ्यातील जनतेनं काँग्रेसची साथ सोडलेली नाही. काँग्रेसचा तिरंगा भंडारा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही.