यवतमाळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणार होता. तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली.


भरसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ


यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं. आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी त्यांना सावरलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर गडकरींना उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


गडकरींची प्रकृती आता स्थिर


सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीनेही 400 पारचा नारा देत प्रचारासाठी कंबर कसली आहे. आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यवतमाळमध्ये आहे. सध्या प्रचारसभांचा धडाका सुरु असून काही ठिकाणी उष्णतेची लाटही पाहायला मिळत आहे. याचा तब्येतीवर परिणाम होऊन गडकरींना सभेदरम्यान भोवळ आल्याचं सांगितलं जात आहे.


विश्रांतीनंतर गडकरींची पुन्हा भाषणाला सुरुवात


महायुतीची सभा सुरु असताना नितीन गडकरी सभेला संबोधित करत होते, यावेळी त्यांना भोवळ आली होती. नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर नितीन गडकरी यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली. 


राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवा


सिंचन, ऑर्गनिक फार्मिंग, मोदी सरकारने जी धोरणे आखली आहेत, त्याचा लाभ आता दिसत आहे. गाव समृद्ध कसे होईल, हा यामागचा विचार आहे. देशात मोदी सरकार आणायचे असेल तर यवतमाळ-वाशिम लोकसभेतून राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवा, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.


गडकरींनी सांगितलं भोवळ येण्याचं कारण


उन्हामुळे हेलिकॉप्टरमधील एसी बंद होता हवा नव्हती आणि आणि तापमान जास्त असल्यामुळे मला त्रास झाला, मात्र थोडा आराम करून पुन्हा आलो. त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतो, असं म्हणून गडकरी यांनी आपले पुसद येथील भाषण संपविलं. भाषण करतेवेळी नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने जवळपास 10 मिनिट त्यांचे भाषण थांबले होते. मात्र पुन्हा उपचार करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर भाषण संपवून ते पुढच्या दौऱ्यावरती निघाले.


पाहा व्हिडीओ : भाषणादरम्यान नितीन गडकरींना भोवळ



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nitin Gadkari : नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ,  या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती?