मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरींना (Nitin Gadkari) यवतमाळच्या सभेमध्ये भाषण करताना भोवळ आल्याची घटना घडली. भाषण करताना अचानक त्यांना भोवळ आल्याने त्यांना अक्षरक्ष: उचलून नेण्यात आलं. नितीन गडकरींना या आधीही अनेकदा भोवळ आल्याची घटना घडली आहे.
गडकरींना या आधी रक्तातील साखर कमी पडल्याने भोवळ आल्याची घटना घडली होती. तर उष्माघातानेही भोवळ येण्याची शक्यता असते. नितीन गडकरींना या आधी कधी आणि कुठे भोवळ आली होती हे पाहुयात,
या आधी गडकरींनी कधी भोवळ आली होती?
1. नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमामध्ये भोवळ आली होती. बंगालमधील सिलिगुडतील दागापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली. भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली होती. त्यांच्यावर तात्काल प्राथमिक उपचार करण्यात आले.
2. डिसेंबर 2018 साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातही गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर गडकरींना भोवळ आली. नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत ठिक झाली.
3. 2019 साली शिर्डीतील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. उष्माघाताने त्यावेळी गडकरींनी भोवळ आल्याचं बोललं जातंय.
4. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमातही राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली होती.
भोवळ का येते?
भोवळ येणे किंवा चक्कर येण्याला वैद्यकीय भाषेत सिनकोप (Syncope) असं म्हटलं जातंय, त्याला फिट येणं असंही म्हटलं जातं. मेंदूला अचानक रक्तपुरवठा कमी पडला तर भोवळ येते. रक्तातील साखर कमी पडल्याने किंवा जास्त झाल्यानेही भोवळ येऊ शकते. त्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही.
भोवळ आल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर अंधार येऊ शकतो. कधीकधी अस्वस्थ वाटून हायपाय थरथरू शकतात. काहीवेळासाठी तो व्यक्ती शुद्ध हरपतो किंवा बेशुद्ध पडतो. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर लगेच तब्येत बरी होऊ शकते.
ही बातमी वाचा: