Continues below advertisement

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्या कार्यकुशलतेचे नेहमीच कौतुक होत असते. दूरदृष्टी ठेऊन काम करणारा नेता, गडकरी म्हणजे रोडकरी अशा शब्दात त्यांच्या कामाचं कौतुक सातत्याने होत असल्याचं दिसून येतं. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही गडकरींच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यासारखा दुसरा भारदस्त नेता दिल्लीत नाही, सत्ताधारी पक्षात महाराष्ट्राचा दिल्लीतील ते व आवाज असल्याचं बोललं जातं. आपल्या कामात अत्यंत पारदर्शक आणि ठेकेदारांना ढोस देऊन काम करणारे मंत्री अशीही त्यांनी ओळख आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी नितीन गडकरींवर गंभीर आरोप केले आहेत. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांच्याच कंपन्यांना लाभ झाल्याचे गंभीर आरोप दमानिया यांनी केले आहेत. दमानियांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता, भाजपकडून (BJP) या आरोपावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाजपकडून पहिली पतिक्रिया आली आहे. गडकरींवरील आरोप तथ्य नसलेले, खोटे आणि जुने आरोप आहेत, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं. तसेच, 2013 साली असेच आरोप झाले होते, तेव्हा कांग्रेसच्या यंत्रणांनी चौकशी केली होती. मात्र, त्या चौकशीतही काहीही तथ्य आढळले नाही. केवळ बदनामी करण्यासाठी असे आरोप गडकरी यांच्यावर करण्यात येत असल्याचे दिसते, असेही उपाध्ये यांनी म्हटलं आहे. खरं तर कोर्टात जात याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. मात्र, काही लोकं तसं करत नाहीत, फक्त बदनामीसाठी बेछूट आरोप करतात, असे म्हणत अंजली दमानिया यांना सल्लाही देण्यात आला आहे.

Continues below advertisement

गडकरींवर काय आहेत आरोप? (Anjali damania on nitin gadkari)

नितीन गडकरी यांनीच जनतेवर टोल थोपवल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. नागरिक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जात आहे? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली. टोलमधून मिळालेला पैसा 'आयडीएल' नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे. ज्यांना 'एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया' म्हटले जाते, ते प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खात आहेत. दमानिया यांनी (BOT TOT model criticism) सरकारच्या बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) या मॉडेल्सवर टीका केली आहे. गडकरी यांच्यावर इथेनॉल संदर्भातही दमानिया यांनी आरोप केले आहेत.

हेही वाचा

नितीन गडकरींच्या पापाचा घडा भरला, हायवेच्या प्रत्येक किमीत पैसा खात आहेत, टोलमधून मिळालेला पैसा IDL कंपनीमार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला; अंजली दमानियांचा गंभीर आरोप