मुंबई : आपआपल्या नेत्यांवर भाष्य करुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना फुलटॉस देऊ नका, असं आवाहन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane BJP) यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना केलं होतं. मात्र आता खुद्द राज्य सरकारनेच एक निर्णय बदलून संजय राऊत यांना फुलटॉस दिल्याचं चित्र आहे. कारण ज्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) रान उठवलं, उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध केला, त्याच ठिकाणी मेट्रोचं कारशेड उभारण्याचा निर्णय, राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मेट्रो 6 चं कारशेड कांजूरमार्गला (Metro 6 car shed Kanjurmarg)
दरम्यान, राज्यतील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने मेट्रो 6 चं कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मेट्रो 6 आणि मेट्रो 3 कारशेड हे आरे इथं उभारण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे सरकार आग्रही होतं. त्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात आरे येथील दोन्ही मेट्रो लाईनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला भाजपने जोरदार विरोध केला होता. मात्र आता मेट्रो 3 चं कारशेड आरे इथेच तर मेट्रो 6चं कारशेड कांजूरमार्गला होणार आहे.
संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. "उद्धव ठाकरेंची भूमिका योग्यच होती हे सिद्ध झालं. आधी तुम्ही कारशेडला विरोध केला मात्र आता तुम्हीही तेच केलं.किती काळ गेला त्यात, किती पैसा खर्च झाला? केवळ विरोधाला विरोध म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कारशेड तिथे होऊ दिलं नाही", असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे योग्य होती जे आरे करत होते आज शेवटी तुमचंच सरकार आहे आणि तुम्हीही त्याच जागेवरती कारशेड उभी करत आहात.लोकांना त्रास झाला. किती खर्च झाला, पण विरोधासाठी विरोध हे भाजपचे धोरण आहे. फडणवीस यांनी कायदेशीर अडचणी उभ्या केल्या. शेकडो आरेची झाडे तोडून पर्यावरणाचा नाश केला आणि शेवटी आलात कुठे हे यांचं राजकारण आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
राम मंदिरावरुन अमित शाहांवर निशाणा
यावेळी संजय राऊत यांनी राम मंदिराबाबत (Ram Mandir) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधला."मणिपूर येथे काय सुरू आहे, गृहमंत्री सांगत आहेत रक्ताचा एक थेंब न देता आम्ही राम मंदिर बांधत आहोत. पण देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती असावी हे दुर्दैव आहे. शेकडो कारसेवकांनी जे बलिदान केले त्यांचा हा अपमान आहे. शरयू नदी रक्ताने लाल झाली होती, आम्ही होतो तिथे, तुम्ही नसाल, पण शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तिथे होते.गोध्रा कांड काय होते, साबरमती एक्स्प्रेस काय होते, हे देखील विसरले का? अमित शाह यांचे विधान हजारो कारसेवकांचा अपमान आहे", असं संजय राऊत म्हणाले.
डरपोक नंबर 1
यावेळी संजय राऊत यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार गटासह शिंदे गटालाही टार्गेट केलं. सर्वजण ईडी, सीबीआयच्या भीतीने भाजपसोबत गेल्याचा आरोप त्यांनी केला. "भविष्यात सिनेमा काढायला हवा. त्या सिनेमाचं नाव "डरपोक नंबर 1" असेल, त्यातले हे सगळे विलन आहेत" असं संजय राऊतांनी सांगितलं.
तुम्ही यांच्यावरती काय विश्वास ठेवता? ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळणारे हे लोक आहेत. डरपोक नंबर एक या चित्रपटातील हे सगळे विलन आहेत. भविष्यात यांच्यावर कोणीतरी चित्रपट काढला पाहिजे, असा हल्ला संजय राऊतांनी चढवला.
VIDEO : संजय राऊत यांची पत्रकार परिषद
ब
संबंधित बातम्या