पुणे : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्यभरात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्त्ववादी भूमिका घेत नितेश राणे अनेकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होत. तर, हिंदू रक्षण आणि हिंदू धर्मासाठी ते आग्रही असल्याचंही दिसून येत आहे. त्यातच, आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणून राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्‍यांना केली आहे. त्यावर, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sanjay andhare) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष लक्ष शुभेच्छा. नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी, असा खोचक टोला शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement

नितेश राणे कायम जरी बडबडत असले तरी त्यांची विधानं अत्यंत महत्त्वाची असतात, ती गांभीर्याने घेतली पाहिजे. वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेली मागणी महत्त्वाची आहे. आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना पूर्वजांचा विसर पडला नाही, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. दहीहंडी उत्सवात जसे गोविंदा, गोपाळा म्हणून गोविंदांच्या टोळ्या वावरतात, अगदी तसे वराह जयंतीदिनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वराह अवतारात संपूर्ण दिवस काढायला हवा, वराह अवतारात हा दिवस साजरा करायला हवा, तेव्हाच खऱ्या अर्थाने वराह जयंती साजरी होईल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती राज्यात साजरी करण्यात यावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्राद्वारे केली होती. हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव (भगवान) हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तीचानाश करणारा आहे. 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनाने वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. हिंदू समाजामध्ये या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकृतरीत्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे, असेही नितेश राणेंनी म्हटलं होतं.  

Continues below advertisement

दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसेच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य तो अधिसूचना देण्यात यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली होती.

जयंतीदिनी खालील बाबी करण्याची राणेंकडून विनंती

25 ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणूनघोषित करावा.शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिककार्यक्रम आयोजित करावेत.शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्यानेआयोजित करावीत.मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्तीचे आयोजन करण्यात यावे.

हेही वाचा