Raj Thackeray Meet Devendra Fadnavis मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. साधारण 45 मिनिटं राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जागांचा विचार केला तर कुंपणच शेत खात आहे. अर्बन नक्षल पेक्षा येथे शिस्त लावा. खोट्या रिक्षा आहे, टॅक्सी आहेत, त्यावर कुठलाही निर्बंध नाहीय, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. 

धनदांडगे येतात आणि आमच्यासमोर पार्किंग नको म्हणतात- राज ठाकरे

मुंबईची लोकल जगात एकमेव आहे जी अशाप्रकारे लोक प्रवास करतात. रोज या शहरांवर माणसं आदळत आहेत. माणसं येणं थांबवण गरजेचं आहे, बाहेरच्या राज्यातील लोकांना येण थांबवावं लागेल. आपल्याकडे कुंपनच शेत खात आहे, सरकारी जमीनीवर झोपडपट्टी उभी होते, मात्र गोदरेजची तशीच आहे. धनदांडगे येतात आणि आमच्यासमोर पार्किंग नको म्हणतात. ती पण गोष्टी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 

गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी एक दोन विषयांवर बोलत होतो- राज ठाकरे

गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी एक दोन विषयांवर बोलत होतो. 2014 ला मी एक एस्थेटीक विषयावर डॉक्युमेंट्री केली होती, ती इतर भाषेतही करतोय. न प्लॅनींग ह्या गोष्टी माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत.  मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पुनर्विकास होत आहेत. अनेक अनधिकृत कामं सुध्दा होतायत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या, ह्या सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्यात, असं राज ठाकरेंनी सांगितले. 400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात. पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Eknath Shinde On BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; एकनाथ शिंदे हसले अन् म्हणाले...