Maharashtra Politics सिंधुदुर्ग : महायुती सरकारमध्ये आमचे तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत. सिंघम आल्यानंतर गुंड पळून जातात, घाबरतात. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) 100  शक्ती कपूर आहेत. आमच्या सिंघमने बदलापूरमध्ये काय केलं, हे तुम्ही पाहत असालच. येणाऱ्या काळात देखील तुम्हाला असेच पाहायला मिळेल. असा मिश्किल टोला भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) महाविकास आघाडीला लगावत सडकून टीका केली आहे.    


मोदींना हरवणे म्हणजे हिंदू समाजाला हरवणे, मोदींना हरवला म्हणजे हिंदू राष्ट्राला कमी लेखन. एमआयएमचे ओवेसी यांना आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचा आहे. म्हणून त्यांना मोदींना हरवायचं आहे. मात्र देशातील हिंदू समाज मोदींना कधीच हरू देणार नाही. त्यामुळे आमच्या हिंदुस्तानवर भगवाच फडकणार, पाकिस्तानचे झेंडे लावू देणार नाही. असेही  नितेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिक राहिले किती? कालच्या सभेत अनेक जण उठून जात होते. कालच्या सभेत उद्धव ठाकरे एरंडेल घेऊन बोलत असल्याचे वाटत होत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या शिवसैनिकांना त्यांचे भाषण ऐकण्यासारखं वाटलं नाही. उद्योगपतींचा जीव जावा, अशी इच्छा व्यक्त करणारे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना माणुसकी नाही, ते स्वार्थी माणूस आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल कमी बोलणं हे चांगलं नाही तर दिवस वाईट जाईल. असे म्हणत  नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.


आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही


स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच बघाव वाकून अशी नेहमी प्रमाणे महाविकास आघाडीची सवय आहे. म्हणून आमदार बाबा सिद्दिकी याच्या हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करून घाणेरडे राजकारण केले जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री सर्व माहिती घेऊन पूर्णपणे पोलीस यंत्रणा तपास कामासाठी लावली आहे. बाबा सिद्धीकी यांची मर्डर का झाली, याची चौकशी सुरू असून लवकरच याची माहिती समोर येईल. या घटने संदर्भात तत्परतेने तपास करणारं महायुतीचे सरकार आहे.  मात्र एवढी तत्परता महाविकास आघाडीच्या काळात होती का? त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.


महाविकास आघाडीच्या काळात मातोश्रीच्या वहिनींचा म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा पोलिसांच्या बदल्या करण्यात किती मोठा हस्तक्षेप होता, हा कधीतरी पुराव्यासहित दाखवावे लागेल.  तेव्हा कंटेनरमधून पैसे बाहेर पाठवलं जाईल. आमच्यावर बदल्या करून पैसे घेण्याच्या आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. असा गंभीर आरोपही आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  


संजय राऊत सुरक्षित नसते तर एवढं बोलू शकले असते का?


सचिन वाझे वर्षावर मुख्यमंत्री बंगल्यावर राहायचे. वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडीचं सरकार म्हणून नाव का पडलं? परमवीर सिंग यांनी पत्र लिहून काय काय आरोप केले होते महाविकास आघाडीवर, तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अवगत केलेलं असं पत्रात लिहिलेलं आहे. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडत नाही. तिथल्या तिथेच त्या आरोपींना शिक्षा देतो. बदलापूर असेल किंवा बाबा सिद्दिकी यांची केस असेल यामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही. संजय राऊत सुरक्षित नसते तर एवढं बोलू शकले असते का? एका महिलेवर वारंवार अत्याचार करून देखील शुद्धीत असते का? संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय आज महाराष्ट्रात मोकळा श्वास घेतोय ते फक्त आणि फक्त आमच्या सरकारमुळेच.असेही  नितेश राणे म्हणाले. 


हे ही वाचा