Nilesh Lanke Joins Sharad Pawar Group : "लहानपणापासून मी शरद पवार यांच्या कामाचा आणि नेतृत्वाचा अभ्यास करणारा माणूस आहे. मी शरद पवार यांच्या विचारधारेचाच आहे, कालही होतो आणि उद्याही राहणार", अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे, असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत. निलेश लंके यांनी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थिती NCP शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.  दरम्यान, निलेश लंके यांना पक्षप्रवेश करताच अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागले. तुम्ही शरद पवारांच्या विचाराचे आहेत, हे समजायला तुम्हा एवढा वेळ कसा लागला? असा प्रश्न निलेश लंके यांना विचारण्यात आला होता. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलय. "जे प्रश्न सगळ्यांना माहिती आहेत, ते विचारायला बंदी आहे", उत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे. 


पवार साहेबांची अदृश्य ताकद मला नेहमीच लाभली


निलेश लंके म्हणाले, कोविड काळात भाऊ भावाला विसरले, नवरा-बायको एकमेकांना विसरले त्या काळात मी शरदचंद्रची पवार आरोग्य मंदिर सुरु केले. त्यानंतर मी या माध्यमातून 31 हजार लोकांना उपचार देऊ शकलो. अदृश्य ताकद मला पवार साहेबांची नेहमीच लाभली. कोविड काळात मी संघर्ष केला. त्या घटना मी विसरु शकत नाही. 


आम्ही साहेबांचे नेतृत्व कधीही सोडले नाही


पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, मी शरद पवारांच्या आशीर्वादाने अद्ययावत सुविधा असलेली रुग्णवाहिका देखील सुरु करणार आहे. आज नगर येथील अनेक सहकारी देखील उपस्थित आहेत. मी त्यांचा आभारी आहे. आम्ही साहेबांचे नेतृत्व कधीही सोडले नाही. आजही माझ्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो आहे. खासदारकीची आणि कोणताही निवडणुकीची अद्याप शरद पवार आणि माझ्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. साहेबांचा विचारधारेचा मी कालपण होतो आणि आज देखील आहे. माझी जर एखाद्या गोष्टीबाबत चर्चाचं झाली नसेल तर त्याबाबत भाष्य करायला नको, असंही लंके यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nilesh Lanke in Sharad Pawar NCP Group : सकाळी अजितदादांनी दम दिला, तरीही दुपारी शरद पवारांच्या गटात, निलेश लंके नगरमधून तुतारी फुंकणार