Neelam Gorhe on Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरेंना सगळा अनुभव आला. असं कोणाला वाटलं नव्हतं की, शिवसेनेचे 10-12 च्या वर आमदार फुटतील. आत्तापर्यंत दोन तीन आमदारांचं निघून गेले होते. एवढे चाळीस आमदार जातील, असं त्यांना वाटलं नव्हतं. कारण त्यांचा आमदारांशी संवाद राहिलेला नव्हता. त्यामुळे 40 आमदार गेल्यामुळे त्याना जो धक्का बसलाय, त्या ट्रॉमातून ते बाहेर आलेले नाहीयेत, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये ते तेवढचं मांडतात", असे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्या अहमदनगर येथे बोलत होत्या.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली होती
निलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुर्ल्याची घटना घडली होती. तिथे काय ते स्वत: भेट द्यायला गेले नव्हते. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कोठेही भेट द्यावी. माझ त्यामध्ये काही मत नाही. उद्धव साहेब कोठेवाडीला मुख्यमंत्री नसताना भेट द्यायला आले होते. त्यावेळेस उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरचे उद्धव साहेब यामध्ये बदल झाला होता. माझं मत एवढंच आहे की, त्यांनी बदलापूरच्या घटनेत राजकीय मतभेद न आणता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून जे काही आज त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. हा विषय डायवर्ट होऊ नये. हा विषय दुसरीकडे जाऊ नये. सर्व पक्षांनी या विषयावर एकमताने काम करावं, अशी माझी त्यांना विनंती आहे.
उद्धव ठाकरे काय काय म्हणाले होते?
बदलापूरच्या (Badlapur School Abuse Case) घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) कडाडून टीका केली आहे. बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच आहेत. राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरला आहे. ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचे घरं आहे. हे दुष्कृत्य ते मान्य करताय का? पोलिस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली. नाहीतर काय करणार.. मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते... राख्याला तरी जागा ...मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
बदलापूरच्या घटनेत तुम्हाला राजकारण दिसतंय तर तुम्ही विकृतच, ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद