Amit Bhangare: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील राजकारणात (Politics) मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे (Amit Bhangare) यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची शिर्डी (Shirdi) येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेली भेट जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवणारी ठरली आहे.

Continues below advertisement

या भेटीत अमित भांगरे यांच्यासोबत त्यांच्या आई सुनीता भांगरे या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे ही बैठक बंद दाराआड झाली आहे. त्यामुळे “या गुप्त भेटीत नेमके काय शिजले?” हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हेदेखील उपस्थित होते, ही बाबही लक्षवेधी आहे. गेल्या पंधरा दिवसांत भांगरे आणि विखे-पाटील यांच्यात ही दुसरी भेट झाल्याने या घडामोडींना अधिक वजन प्राप्त झाले आहे.

Amit Bhangare: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे वाढली उत्सुकता

येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव ठरले आहे. या पार्श्वभूमीवरच भांगरे-विखे भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुनीता भांगरे या अकोले तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अध्यक्षपदाचे आरक्षण आणि त्यांच्या उमेदवारीची शक्यता पाहता, भाजपच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Continues below advertisement

Amit Bhangare: ‘भांगरे भाजपमध्ये जाणार? 

अमित भांगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी अनेक सभांमध्ये “आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय बाप शरद पवारच आहे” असे ठाम विधान केले होते. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर परिस्थिती बदलताना दिसत आहे.

विखे-पाटलांशी सलग दोन भेटी आणि भाजप नेत्यांशी वाढता संपर्क पाहता, भांगरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर हे खरे ठरले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Amit Bhangare: पुढील काही दिवस निर्णायक

भांगरे-पिचड-विखे या तिघांची शिर्डीतील बैठक संपल्यानंतर, पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळतील, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अमित भांगरे पुढे कोणता निर्णय घेतात? शरद पवारांच्या सोबत राहणार की भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?