पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. 16 एप्रिल रोजी पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली, याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Continues below advertisement


महेश तपासे यांचे आजोबा माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी आधीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकार बांधत असलेल्या स्मारकाला पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांची नाराजी ओढावून घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. मात्र, अचानकपणे सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांणा उधालं आले आहे.


पक्षाच्या 16 एप्रिल रोजी झालेल्या बैठकी नंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने पाणीपत येथे बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको, अशी भूमिका पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे या बैठकीमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेला होणारा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आधी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


महेश तपासे यांनी या निर्णयाला केलेला विरोध यामागे देखील काही कारण आहे. महेश तपासी यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी याआधी पाणीपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या स्मारकाला महेश तपासे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात महेश तपासे यांनी आधीच पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील इतर नेते त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रतिक्रिया


पक्षात1999 पासून निवडणुका झाल्या की पक्षांतर्गत बदल हे केले जातात. कारण या काळात पक्षाला अनेक नवे नेते जोडले गेलेले असतात. त्यांना देखील काम करण्याची संधी द्यायची असते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या आहेत. यामुळे आता पक्षात हळूहळू बदल करण्यात येत आहेत. मागील 15 दिवसांत प्रवक्ते पदाच्या बाबत पक्षात २ बैठका पार पडल्या आणि त्यानंतर आता नवे पदाधिकारी नेमण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार लवकरच निवड प्रक्रिया पार पडेल.