Sushma Andhare On Bjp: उद्धव गटाच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली आहे. या महाप्रबोधन यात्रेत सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भाषणे गाजताना दिसत आहे. आज वाशी येथे आयोजित महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लक्ष करत म्हटलं आह की, मोदींजींना विचारायचे असेल तर मला हिंदी मधूनच बोलावे लागेल. बोली भाषेत बोलून काय उपयोग. त्या म्हणल्या आहेत की, मोदीजी आम्हाला आटा पाहिजे, डाटा नाही. यातच मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना त्या म्हणल्या की, ''दीदी ओ दीदी,  असे व्यक्तव्य मोदी यांनी बंगालमध्ये केले होते, ते चालते काय?''   


यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, ''भारतीय संविधानाची चौकट मोडण्याचा डाव भाजपा करत आहे. ते उघडे करण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे.'' ऋतुजा लटके यांच्यावरून बोलताना त्या म्हणाल्या की, सत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असावी, विकेंद्री असावी असं संविधान आहे. असे असताना मुंबई मनपा जाणीव पुर्वक राजकीय भूमिकेत जात आहे. 


मी सत्तेच्या काळात नाही, तर अडचणीच्या काळात शिवसेनेत आली: अंधारे 


अंधारे म्हणाल्या आहेत की, मी गरीब लेकरू असूनही मला चितावणीखोर बोलतात. सरकार नसताना सुध्दा तुम्हाला आमची ऐवढी धास्ती आहे. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी धमक्या दिल्या म्हणजे ते सतसंग सांगत आहेत. त्यांचा रडीचा डाव आम्ही या महाप्रबोधन यात्रेत उघडे पाडणार आहे. मी सत्तेच्या काळात नाही, तर अडचणीच्या काळात आली आहे. 


शिंदे आणि ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, फडणीस यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिंदे यांना चिन्हासाठी मदत केली. फडणवीस आणि शिंदे या दोन तलवारी एकाच ठिकाणी कशा राहणार. अंधारे म्हणाल्या, भाजपाचा युएसपी जातीयवादी आहे. लोकांना घरे नाहीत. मग मोदीची घरघर तिरंगा कसा पोचणार? देशात अनेक भागात महिलांवर अन्याय झाले. अत्याचार झाले, आता स्मृती इराणींच्या स्मृतीस काय झाले. 


पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरकार उध्दव ठाकरे यांच्यावर अन्याय करायला बसलं आहे की, जनतेचे प्रश्न सोडवायला? पहाटे पहाटे भाजपाने राष्ट्रवादी बरोबर शपथ घेतली, ते काय नैसर्गिक होते की, अनैसर्गिक? माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कोणी बोट दाखवेल त्याचा व्याजा सकट नाही तर चक्रवाड व्याजासहीत वसूल केले जाईल. बाई म्हणून हलक्यात घेवू नका.