Loksabha Election : गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील दोन प्रमुख राजकीय पक्षांत फुट पडली. त्यांनंतर त्यापैकी एक गट भाजपसोबत गेला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरश: चिखल झाला आहे. दरम्यान, पक्ष फुटल्यामुळे  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. भाजपला लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) सामोरे जाताना ठाकरे-पवारांना मिळणारी सहानुभूती डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे भाजपकडून ठाकरे, पवारांना काऊंटर करण्यासाठी 'ब्रम्हास्त्रा'चा केला जाणार आहे. भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.


मोदींच्या महाराष्ट्रातील सभांची संख्या वाढली 


भाजपकडून 45 पारच्या घोषणा देण्यात येत असल्या तरी पूर्वी निवडून आलेल्या 41 जागा राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची संख्या वाढली आहे. गुजरातचा विकास म्हणजेच देशाचा विकास असा दावा करणार्‍या पीएम मोदींनी लोकसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्रात जोर लावलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या जास्त जागा असणार्‍या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. त्यामुळे मोदी महाराष्ट्रात प्रचाराला प्राधान्य दिलं आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मोदींच्या 5 सभा झाल्या. पुढील 4 दिवसांत मोदींच्या 7 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यात नांदेड आणि परभणीमध्ये मोदींच्या सभा पार पडल्या आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शुक्रवारी (दि.25) पार पडणार आहे. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मोदींच्या सभा पार पडणार आहेत. 


कोल्हापूर , सोलापूर, सातारा, पुण्यातही सभा ?


महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर मोदींच्या सभांना पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात 29 एप्रिल रोजी सभा पार पडणार आहे. तर कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ 27 एप्रिल रोजी सभेचे आयोजन आहे. याशिवाय पुण्यात रोड शो चे आयोजनही करण्यात आले आहे. 30 एप्रिल रोजी पीएम मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरला सभा घेण्याचा महायुतीचा मानस आहे. 


ठाकरे-पवारांना मोदींच्या सभांनी प्रत्युत्तर 


चौथ्या टप्प्यात अहमदनगर, जळगाव, औरंगाबादमध्ये पीएम मोदी सभा घेणार आहेत. अखेरच्या पाचव्या टप्प्यात मोदींचे टारगेट मुंबई असणार आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीची संयुक्त सभा होणार आहे. तर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आतापर्यंत पाच जाहीर सभा झाल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड मविआच्या शिलेदार, महायुतीचा उमेदवार कोण?