Sanjay Raut & Devendra Fadnavis : पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2025) मुहूर्त साधत रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे त्यांनी म्हटले. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, हे संकेत स्पष्ट आहेत. सप्टेंबरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सत्तेच्या पदावर 75 वर्षानंतर राहू नये याची सर संघचालकांनी आठवण करून दिली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाला आवश्यक ती व्यक्ती यावी, ही भूमिका स्पष्ट आहे. संघाची गरज नाही, असे नड्डा म्हणाले ती भूमिका मोदींची होती. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते. ते नॉन बायोलॉजिकल जरी असले तरी देश नॉन बायलॉजिकल नाही. तुम्ही जे धोरण बनवले तसे ते झोला भरून घेऊन जातील. मोदींचे वारसदार हे आरएसएस ठरवेल म्हणून त्यांना बोलण्यात आले. संघाची चर्चा बंद दाराआड असते. पण, काही संकेत असतात. त्याप्रमाणे मोदींचे पुढचे वारसदार महाराष्ट्रातून असेल, असे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मोगली संस्कृती आहे. वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या