Ajit Pawar On Devendra Fadnavis Municipal Election 2026: आगामी राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Corporation Election 2026) राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल जाहीर केलं. 

Continues below advertisement

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यात भाजपाने राष्ट्रवादीविरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार काय म्हणाले? (Ajit Pawar On Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावरुन अजित पवारांना माध्यमांशी विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत विचार करुनचं भाष्य केलं असेल. पुणे आणि पिंपरी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी सगळं पणाला लावणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या युतीबाबत विचारले असता, थोडी कळ काढ, आताच निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

Continues below advertisement

पुण्यात काका-पुतण्या एकत्र? (Sharad Pawar-Ajit Pawar Alliance In Pune?)

महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळेंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा अन शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला असा दावा नाना काटे यांनी केला. काटे आणि गव्हाणे यांनी अजित पवारआणि सुप्रिया सुळेंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतचं ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं. 

महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक (Municipal Corporations Election Schedule)

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
  • उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
  • चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
  • मतदान - 15 जानेवारी
  • निकाल - 16 जानेवारी

मुख्यमंत्री म्हणाले पुण्यात वेगवेगळे लढणार, अजितदादा काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Pimpri Chinchwad Election: महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र