Lok Sabha Election Result 2024 नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मला मदत केली, असे चुकीचे वक्तव्य करणारे संजय राऊत (Sanjay Raut) मला भेटले, तर त्यांना मी चांगल्याने समजावून सांगेल. भाजपमध्ये गडकरी, फडणवीस हेच असे नेते आहे जे कधी दुसऱ्या पक्षाला मदत करणार नाही. गडकरी (Nitin Gadkari) विरोधात पराभूत झालो तरी नैतिक विजय माझाच झाला आहे. गडकरी सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाची आघाडी 2 लाख 18 हजार वरून 1 लाख 37 हजारांवर आली आहे. ही किमया काँग्रेसने करून दाखवली आहे. नागपुरातील पाच विधानसभा क्षेत्रात भाजपची आघाडी आम्ही कमी करून दाखवली. त्यामुळे हा माझा नैतिक विजय असल्याचा दावा नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केला आहे.
संजय राऊत मला भेटल्यास त्यांना चांगल्याने समजवेल- विकास ठाकरे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूरात भाजपचे मताधिक्य अर्धे झाले आहे. मी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील मतदारसंघातला रहिवाशी असून माझा स्वतःचा तिथे जनतेशी जनसंपर्क आहे. तिथल्या जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळेच मी तिथे भाजपचा मताधिक्य कमी करू शकलो, असा दावाही विकास ठाकरेंनी केला आहे. भाजपमध्ये गडकरी आणि फडणवीस हेच असे दोन नेते आहे जे कधीच दुसऱ्या पक्षाला मदत करणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी फडणवीस यांनी मला मदत केल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. राऊत मला भेटले तर एखाद्या दिवशी मी त्यांना चांगल्याने हे समजावून सांगेन, असे सांगून विकास ठाकरे यांनी संजय राऊतच्या काही दिवसांपूर्वीच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसच्या यशात नाना पटोले यांचे मोठे योगदान - विकास ठाकरे
गेल्या काही काळापासून माझ्यावर वारंवार भाजपमध्ये जाण्यासंदर्भात केले जाणारे आरोप आता खोटे ठरले आहेत. काँग्रेसचे नेते जरी इतर पक्षात गेले, तरी काँग्रेसचा मतदार कधीच दुसऱ्या पक्षात जात नाही. त्यामुळे मी काही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी मला वेड लागले नसल्याचेही विकास ठाकरे म्हणाले. विदर्भात आणि महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेला यशात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे योगदान आहे. जर त्यांना मुख्यमंत्री करण्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत असले, तर ती रास्त भावना असल्याचेही ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या