Nagpur News : नागपुरात काँग्रेसचे विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी यांच्या सेंट्रल एवेन्यूवरील आंबेडकर चौक जवळच्या कार्यालयातील नाम फलकाला काळे फासण्यात आले आहे. अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri) विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी त्यांच्या कार्यालयातील नाम फलकावर 'आमदार पूर्व नागपूर' असे विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला होता. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. अशातच काल वंजारी यांच्या आंबेडकर चौक जवळील कार्यालयाच्या दार आणि नामफलकावर अज्ञात आरोपींनी काळे फासले. त्यानंतर वंजारी यांच्या कार्यालयाकडून पोलीस तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असावे, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

आमदार कृष्णना खोपडे यांच्या घरापुढे आंदोलन

नागपूरमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे बघायला मिळालं आहे. काल काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली, असा आरोप करण्यात येतोय. याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कडनं पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णना खोपडे यांच्या घरापुढे आंदोलन केले जात असतांना हा तणाव निर्माण झाला.

एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते नारेबाजी करत होते, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही नारेबाजी करत असल्याने पोलिसांनी बॅरेकेटींग करत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी त्यालाही ओलांडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कार्यकर्त्यांमधली झडप टळली.

कृष्णा खोपडे यांनी केलं आपल्या कार्यकत्यांच्या कृतीचे समर्थन

अभिजित वंजारी हे विधान परिषदच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार आहे. त्याचे नागपूरच्या वर्धमान नगर भागात 2020 पासून जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या पाटीवर आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आहे. त्याला भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. त्यातून भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी आमदार अभिजित वंजारी यांची मागणी आहे. तर कृष्णा खोपडे यांनी आपल्या कार्यकत्यांच्या कृतीचे समर्थन केलं आहे.

आणखी वाचा