Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अनंजनगाव सूर्जी, बाळापूर, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठीही आज मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान तर उद्या (21 डिसेंबर) राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे.

Continues below advertisement

देऊळगाव राजा पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-

बुलढाण्यातील देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. तर शेगावमधील दोन, खामगावमधील चार आणि जळगाव जामोदमधील तीन प्रभागात आज मतदान होणार आहे. देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तीन महिला उमेदवार तर सदस्य पदासाठी 77 उमेदवार रिंगणात असून एकूण 80 उमेदवारांचा फैसला 29 हजार 300 मतदार करणार आहेत. या निवडणुकीत ऐनवेळी अनेक उमेदवारांनी केलेले पक्ष बदल आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम बघायला मिळत आहे देऊळगाव राजा नगर परिषदेची निवडणूक ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आ. मनोज कायंदे आणि माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.

 मंगळवेढ्यात आज नगराध्यक्ष आणि 19 जागांसाठी होणार मतदान- (Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025)

मंगळवेढा नगरपालिकेसाठी आज मतदान होत असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी भाजप आणि अजित पवार युतीमधून भाजपच्या सुचेता अजित जगताप या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा बबनराव अवताडे या निवडणूक लढवीत आहेत. विरोधातून लढत असलेल्या सुनंदा अवताडे या भाजपा आमदार समाधानावताडे यांच्या चुलती असून यामुळेच भावकीचा वाद या निवडणुकीत उफाळून आला होता. गेल्या वेळी मंगळवेढा नगरपालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची सत्ता होती. मात्र सलग दोन वेळेला येथे विधानसभेत भाजप आमदार समाधान आवताडे विजयी झाल्याने यंदा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याची जोरदार तयारी आमदार अवताडे यांनी केली आहे. भाजपच्या जोडीला अजित पवार गटाची ताकद मिळाल्याने येथील निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. आज मंगळवेढा नगरपालिकेसाठी 10 प्रभागातून 19 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी 28 हजार 538 एवढे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.

Continues below advertisement

आज पुढील 23 पालिका,पंचायतींसाठी मतदान- (Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025)

अंबरनाथकोपरगावदेवळाली -प्रवरापाथर्डीनेवासाबारामतीफुरसुंगी-उरुळी देवाचीअनगरमंगळवेढामहाबळेश्वरफलटणफुलंब्रीमुखेडधर्माबादनिलंगारेणापूरवसमतअंजनगाव सूर्जीबाळापूरयवतमाळवाशिमदेऊळगावराजादेवळीघुग्घूस

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: