Jalgaon Nagarparishad Election Result 2025: राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपने (BJP) सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्ष (Nagaradhyksha) निवडून आणत राज्यात आपणच एक नंबरचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या निवडणुकीत अनेक रंजक निकाल पाहायला मिळाले. यापैकीच एक म्हणजे जळगावच्या नशिराबाद नगपरिषदेचा (Jalgaon Nashirabad Election Result) निकाल. याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेच्या (Shivsena) युतीने 14 जागांवर विजय मिळवला.  भाजपचे योगेश पाटील यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला. आजचा हा विजय मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Election news)

Continues below advertisement

मात्र,  नशिराबादमधून निवडून आलेल्या 77 वर्षांच्या जनाबाई भगवान रंधे यांचा विजय हा या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला. यानिमित्ताने वय केवळ एक आकडा असतो, जनाबाई भगवान रंधे (Janabai Randhe) यांनी दाखवून दिले.नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, जेव्हा त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना आपले अश्रू अनावर झाले. आपल्या कार्यकर्त्यांची आणि आप्तांची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यांचा हा विजय केवळ राजकीय नसून तो जिद्द आणि विश्वासाचा विजय मानला जात आहे. जनाबाई रंधे यांना विजयी घोषित केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे जनाबाई रंधे 77 व्या वर्षी नगरसेवक झाल्या आहेत. मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जनाबाई रंधे कार्यालयाजवळ आल्या, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेल्या जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने जनाबाई भावूक होताना दिसल्या.

यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे तब्बल 3300 नगरसेवक निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाला 48 टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे भाजपसाठी हा अत्यंत मोठा विजय मानला जात आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , पणनमंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रभावक्षेत्रात महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले.

Continues below advertisement

आणखी वाचा

Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर