Nagarparishad Election Congress: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये (Nagarparishad Election) भाजप (BJP) आणि महायुतीने (Mahayuti) सत्ता मिळवली असली, तरी राजकीय वर्तुळात मात्र भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सातत्याने निवडणूक पराभवांचा सामना करणाऱ्या काँग्रेससाठी ही निवडणूक काहीशी दिलासादायक ठरल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

2014 नंतर सलग अनेक निवडणुकांमध्ये अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या 43 जागा आणि नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकून पराभवाची मालिका काही अंशी खंडित केली आहे. हे यश काँग्रेससाठी कमी लेखण्यासारखे नसल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी व्यक्त केले आहे.

Harshvardhan Sapkal: एकाकी प्रचार, पण ठाम भूमिका

या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी तसेच काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवलेली असताना, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र राज्यभरात स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे, हेलिकॉप्टरचा वापर न करता त्यांनी राज्यात 64 जाहीर सभा आणि 22 बैठका घेतल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये विदर्भात सर्वाधिक 23 जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे. हे यश पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Continues below advertisement

Harshvardhan Sapkal: “हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है”

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है…!” भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, त्या मार्गाने काँग्रेसला सत्ता नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला सत्याच्या आणि जनतेच्या मनातील सत्ता हवी आहे. त्या दिशेनेच आमचा संघर्ष सुरू राहील,” असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस याच पद्धतीने लढेल, असा इशाराही त्यांनी दिला. “बचेंगे तो और भी लढेंगे…!” असा सूचक नारा देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.

Nagarparishad Election Congress: काँग्रेस व पुरस्कृत उमेदवारांचे यश

विदर्भ – 23

मराठवाडा – 05

पश्चिम महाराष्ट्र – 03

कोकण – 01

काँग्रेस पुरस्कृत स्थानिक आघाडी – 07

Harshvardhan Sapkal: काँग्रेस कार्यकर्ता आजही एकनिष्ठ : हर्षवर्धन सपकाळ

गेल्या दहा वर्षांत अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आजही एकनिष्ठ असून सत्याच्या मार्गाने चालणारा आहे, असा दावा सपकाळ यांनी केला. नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती असतानाही, एकट्या हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या एकाकी लढ्यामुळे महायुतीच्या यशात काँग्रेसचे योगदानही दुर्लक्षित करता येणार नाही, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. एकंदरीत, भाजपच्या विजयाच्या गदारोळात काँग्रेसच्या संघर्षाची आणि मिळालेल्या मर्यादित पण महत्त्वपूर्ण यशाची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.

आणखी वाचा 

BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, अमराठी विभागांमधील स्ट्रॅटेजीवर चर्चा