BJP-Shivsena Shinde Group Mahayuti Municipal Corporation Election 2025: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांसोबत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांचं एकमत झालं पण महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं मात्र जागावाटपात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.(Mahayuti Municipal Corporation Election 2025)

Continues below advertisement

महापालिका निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी संघर्ष दिसून येत आहे, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण झालं आहे. महापौर कोणाचा? इतर पदांबाबत काय? यासंदर्भात तिढा कायम असल्याचं चित्र आहे. जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत, त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे. आधीच्या निवडणुकीत जिथे आमदार जिंका ती जागा त्याला असा फाॅर्म्युला वापरण्यास देखील अडचणी येत आहेत. दरम्यान, युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक वर्तवली जात आहे. कल्याण डोंबिवलीच्या १३१ जागांच्या पालिकेत भाजपला किमान ५५-६० जागा पाहिजे असल्याची सूत्रांची माहिती आहे, मात्र, शिंदेंच्या शिवसेनेचा त्याला तीव्र विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.

 Eknath Shinde and Ravindra Chavan Meeting: एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत काय काय घडलं?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगानं बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघाला. (Municipal Corporation Election 2025) राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे. 

Continues below advertisement

आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. तसेच दोन्ही पक्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.