अकोला : अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena UBT) गटाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shinse Shivsena) प्रवेश केला आहे. नागपुरातील एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या 'देवगिरी' शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडलाय. राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.‌ यासोबतच काही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) अकोला शहरात मोठं खिंडार पडलंय. तर मिश्रांच्या पक्षप्रवेशाने शिंदे यांच्या शिवसेनेला (Shinse Shivsena) शहरात मोठं बळ मिळालंय. मावळत्या अकोला महापालिकेतील 8 पैकी 6 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत (Shinse Shivsena) प्रवेश केलाय. (Shivsena UBT)

Continues below advertisement

राजेश मिश्रा यांचे कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून अकोला महापालिकेच्या राजकारणात आहेत. मिश्रा यांचे वडील, आई, ते स्वत:, पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. राजेश मिश्रा यांनी 2024 ची निवडणूक अकोला पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवत अडीच हजारा़पर्यंत मतं घेतली होती. त्यांच्यामुळेच अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे राजेश मिश्रांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे महायुतीतील भाजपचे स्थानिक नेते यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय आहे. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात  आहे.आता डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Who is rajesh Mishra: कोण आहेत राजेश मिश्रा 

- ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते. - राजेश मिश्रांचा अकोल्याच्या जुने शहर भागातील हरिहरपेठ भागात मोठा दबदबा. - 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजेश मिश्रांनी स्वत: आणि पत्नीसह सर्वच्या सर्व चार जागा आणल्या होत्या निवडून. - गेल्या 40 वर्षापासून मिश्रा कुटूंबिय नगरपालिका आणि महापालिका सभागृहात. - मिश्रा यांचे वडील, आई, ते स्वत:, पत्नी आणि वहिनी हे महापालिकेत नगरसेवक राहिलेत. - राजेश मिश्रा ठाकरे गटाचा अकोला शहरातील कट्टर हिंदूत्ववादी चेहरा. - 2014 मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून राजेश मिश्रांनी अपक्ष म्हणून घेतलेल्या 2500 मतांमुळे भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव. काँग्रेसचे साजिदखान पठाण विजयी.

Continues below advertisement