Narendra Modi: पेट्रोल-डिझेलचा (Diesel-Petrol) वापर कमी करा आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना (Narendra Modi 9 Suggestions) केलं. मात्र नरेंद्र मोदींच्या या आवाहनावर आता सामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Continues below advertisement

नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक काय काय म्हणाले? (Mumbaikar React On Narendra Modi Appeal)

एबीपी माझाने मुंबईतील पेट्रोल पंपांवर नागरिकांशी संवाद साधला असता, सर्वसामान्यांनी पेट्रोल कमी वापरावं म्हणण्याआधी मंत्र्यांचे ताफे कमी करा... एका नेत्यामागे दहा-दहा गाड्या फिरतात, छोट्या अंतरासाठीही हेलिकॉप्टरचा वापर होतो, ते आधी बंद करा, अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे, मेट्रोचा वापर करा म्हणता, पण मेट्रोचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. सरकारने मेट्रो फ्री करावी किंवा भाड्यात मोठी कपात करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आता सामान्य नागरिकांच्या या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहेत.

लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित- (Narendra Modi 9 Suggestions)

देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Diesel-Petrol) वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलं. हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल नरेंद्र मोदींनी मतं मांडली. आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या अपुऱ्या पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांत इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Continues below advertisement

नरेंद्र मोदींनी देशवासियांना कोणती 9 आवाहनं केली? (Narendra Modi 9 Suggestions)

  1. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत.
  2. खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा...
  3. पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका...
  4. वर्षभर परदेशी प्रवास टाळा...
  5. कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे.
  6. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
  7. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा...
  8. वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या...
  9. परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा...

संबंधित बातमी:

Shailendra Deolankar On Narendra Modi: सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर