Shailendra Deolankar On Narendra Modi: देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Diesel-Petrol) वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलं. हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल नरेंद्र मोदींनी मतं मांडली.

आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या अपुऱ्या पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांत इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशांमधली युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल, त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तीक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं. (Shailendra Deolankar On Narendra Modi) 

आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर काय काय म्हणाले? (Shailendra Deolankar On Narendra Modi)

पंतप्रधानांनी भारतीयांना केलेलं आवाहन हे अत्यंत सयुक्तीक आणि योग्य वेळेला केलं गेलं आहे. आखातामधील संघर्ष अजून सुटलेला नाहीय. अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून केवळ 10 टक्के जहाजांचा प्रवास होत आहे. आखातात अजूनही परिस्थिती स्फोटक आहे, कधीही संघर्ष चिघळू शकतो, अशी धक्कादायक माहिती शैलेंद्र देवळाणकरांनी दिली. 76 देशांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत अमेरिकेतही वाढल्या आहेत. भारतीयांना सोन्याचे दागिने, डेस्टिनेशन वेडिंग यात रस असतो. जानेवारी 2026 मध्ये 12 बिलियन डॉलर इतकं सोनं भारतीयांनी आयात केलं.सोन्याचा, तेलाचा व्यवहार हा प्रामुख्याने डॉलरमध्ये केला जातो. ही वेळ डॉलरची सेव्हिंग करण्याची वेळ आहे, अशी माहिती शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. सेंद्रिय खतांचा वापर करा, युरियाचा वापर कमी करा...परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करणे थांबवा. जेणेकरून डॉलरचा कमी वापर होईल. भविष्यातला संघर्ष गृहित धरून हे नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन आहे, असंही शैलेंद्र देवळाणकरांनी सांगितले.

नरेंद्र मोदींनी देशवासियांना कोणती 9 आवाहनं केली?

  1. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत.
  2. खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा...
  3. पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका...
  4. वर्षभर परदेशी प्रवास टाळा...
  5. कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे.
  6. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
  7. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा...
  8. वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या...
  9. परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा...

संबंधित बातमी:

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी