मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या (Baba Siddique Attack Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या पोलीस अंगरक्षकाला सेवेतून कमी करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी (Baba Siddique Attack Case) प्रनेमण्यात आलेले पोलीस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्याम सोनवणे मुंबई पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा कार्यालयात कार्यरत होते. १२ ऑक्टोबर २०२४ ला खेरवाडी परिसरात कार्यालया जवळच बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून करण्यात हत्या आली होती. घटनेच्या काही दिवसातच सोनवणे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. गँगस्टर अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी आतापर्यंत २७ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे(Baba Siddique Attack Case) प्र

Continues below advertisement

Baba Siddique Death Case :  नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर २०२४ मध्ये वांद्रे येथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी श्याम सोनावणे हे सिद्दिकी यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर हजर होते. मात्र, हल्ल्याच्या वेळी प्रतिकार करण्यात किंवा परिस्थिती हाताळण्यात त्यांनी कसुरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सोनावणे यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते. २ मे २०२६ रोजी त्यांना बडतर्फीची अधिकृत नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची पोलीस कारकीर्द संपुष्टात आली आहे

२०२४ मध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यादरम्यान कर्तव्यात कसुरी आणि निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने एका पोलीस हवालदाराला सेवेतून बडतर्फ केले आहे.अप्पर पोलीस आयुक्त (संरक्षण आणि सुरक्षा) यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत विभागीय आदेशानुसार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथे जेव्हा ही घटना घडली, तेव्हा हेड कॉन्स्टेबल श्याम मगन सोनावणे हे बाबा सिद्दीकी यांचे अंगरक्षक म्हणून तैनात होते.

Continues below advertisement

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, कर्तव्य बजावताना सोनावणे हे बेजबाबदार आणि निष्काळजी असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती आणि १८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर, २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये बडतर्फीच्या शिक्षेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी करण्यात आला आणि २ मे २०२६ रोजी सोनावणे यांनी हा आदेश स्वीकारला.

Baba Siddique Death Case :  गोळीबाराच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांना तीन पोलीस कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती, जे शिफ्टमध्ये काम करायचे. सिद्दीकी यांच्यासाठी '२+१' अशी सुरक्षा व्यवस्था होती, ज्यामध्ये दिवसा दोन आणि रात्री एक कर्मचारी असायचा. हल्ल्याच्या दिवशी रात्री ८:३० च्या सुमारास एक सुरक्षा रक्षक निघून गेला होता, त्यामुळे रात्री ९:३० वाजता हल्ला झाला तेव्हा सोनावणे हे सिद्दीकी यांच्यासोबत एकटेच होते.

हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा सोनावणे यांनी कोणताही प्रतिकार केला नाही किंवा तातडीने कारवाई केली नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. चौकशीदरम्यान सोनावणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, दसऱ्यानिमित्त परिसरात फटाक्यांची आतिशबाजी सुरू असल्याने आणि मिरवणुकांमुळे गोंगाट असल्याने त्यांना हल्लेखोरांना ओळखता आले नाही. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हल्ल्याच्या वेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत कोणताही खाजगी सुरक्षा रक्षक किंवा बाऊन्सर नव्हता, केवळ एकच पोलीस हवालदार उपस्थित होता.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात आपले पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांच्या छातीला गंभीर जखम झाली होती. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.