Omraje Nimbalkar: उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजे रॉकेट आहेत. ते सरळमार्गी आहेत. तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणजे डबल धमाका आदली आहेत. खाली आणि वर सारखाच आवाज अशी उपमा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी दिली. एबीपी माझाच्या राजकीय फटाके या कार्यक्रमात ओमराजे बोलत होते. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणजे नागगोळी, हातही काळा होतो आणि जमिनही असा टोला खासदार ओमराजे यांनी लगावला.
पारंपारिक विरोधक असणाऱ्या आमदार राणा जगजीतसिंह पाटलांना ओमराजे निंबाळकरांनी भुई चक्करची उपमा दिली आहे. तर किरीट सोमय्या म्हणजे भुंगा फटाका असल्याचे ओमराजे म्हणाले. तर शरद पवार म्हणजे सुतळी बॉम्ब मोठा आवाज असल्याचे ओमराजे म्हणाले. तर राहुल गांधी म्हणजे लक्ष्मी तोटा ओरिजनल आवाज असल्याचं ओमराजे यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या राजकीय फटाके या कार्यक्रमात धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते.
कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा?
यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी विविध नेत्यांनी फटाक्यांच्या उपमा दिल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये शरद पवारांना सुतळी बॉम्बची उमपा देण्यात आली. एकदा ठरवलं की ठरवलं. सुतळी बॉम्बचा आवाज मोठा असतो, या आवाजाला सघलेच घाबरतात असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी शरद पवारांची स्तुती केली. तसेच राणा जगजितसिंह पाटील यांना ओमराजे निंबाळकांनी भुई चक्करची उपमा दिल्याचं पाहायला मिळालं. पहिल्यांदा म्हणायचं अजित पवार यांनी खूप त्रास दिला म्हणून बंड केलं. परत म्हणायचे विकासासाठी भाजपमध्ये गेलो. परत लोकसभेची निवडणूक आली की पत्नीनं राष्टरवादीत प्रवेश करायचा आणि सांगायचा विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो. कायम स्वत:च्या स्वार्थासाठी यांची गोल भूमिका असते असेही ओमराजे म्हणाले. तर किरीट सोमय्या म्हणजे भुंगा फटाका आहेत. फक्त भुई भुई करायचं पण वस्तुस्थिती काहीच नसते असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुसका फटका
उद्धव ठाकरे म्हणजे रॉकेट आहेत. ते सगळमार्गी आहेत. जे बोललय ते करतात. जे केलंय तेच सांगतात. रॉकेटकडे बघितलं की उद्धव ठाकरेंची आटवण होते असे ओमराजे म्हणाले. आदित्य ठाकरे हे आदली आहेत. खालीपण आवाड मोठा आणि वर देखील आवाज मोठा होतो असेही ओमराजे म्हणाले. संघर्षाच्या काळात आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना चांगली साथ दिल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. मंत्री तानाजी सावंत यांना नागगोळीची उपमा दिली. हात पण काळे होतात आणि जमिनपण काळी होते असा टोला त्यांनी तानाजी सावंत यांना लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फुसक्या फटाक्याची उपमा दिली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. सत्तेचा अंहकार त्यांना आल्याचे ओमराजे म्हणाले.
राहुल गांधी लक्ष्मी तोटा, अमित शाह आणि फडणवीस कपटी फटाका
राहुल गांधी यांना लक्ष्मी तोट्याची उपमा दिली. आवाज खरा आणि खणखणीत असतो असे ओमराजे म्हणाले. राहुल गांधींची प्रतिमा भाजपकडून मलिन करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांनी भारत एकसंध राहण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे राहुल गांधी म्हणाले. भविष्य त्यांच्यासाठी चांगले आहे. जो कपटी फटाका आहे तो अमित शाह यांनी देता येईल असे ओमराजे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना देखील कपटी फटाका लागू होईल असे ओमराजे म्हणाले. पक्ष फोडणे, कट कारस्थान त्यांनी केले. या गोष्टी जनतेला आवडल्या नाहीत असे ओमराजे म्हणाले.