Supriya Sule On Modi Government: मोदी साहेबांनी एवढ्या संस्था विकत आहेत आणि आम्हाला विचारतात 60 वर्षात आम्ही काय केलं. आम्ही जे 60 वर्षात केलं, तेच विकून तुम्ही सरकार चालवत आहेत, अशी थेट टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. शिवाय राज्यातील भाजप नेत्यांना ही त्यांनी लक्ष केलंय. परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद तथा कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
 
सोनपेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनपेठ शहरातील पद्मिनी मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सुप्रिया सुळे यांचा बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सत्कार केला. या परिषदेला मोठ्या संख्येने महिलांसह, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि महिलांच्या प्रश्नांबाबत थेट मोदींवर निशाणा साधलाय. 


गरीबाना मोफत सिलेंडर देतो म्हणून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागल. यांचा फोटो असतो पेट्रोल पंपावर. मोदींना फक्त जाहिरात बाजी करता येते. पण त्यांना मला स्वर्गीय सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यायची आहे. त्या जेंव्हा विरोधी पक्षात होत्या तेंव्हा सिलेंडर 400 रुपये होत. आता हजारांच्यावरती गेलं आहे, याचं भान आहे का त्यांना, असेही त्या म्हणाल्यात. सोबतच राज्यातील भाजप नेते उठसूट आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना दुसरं कामच राहील नाही. त्यांनी एक लक्षात ठेवावे त्यांच्याकडे जे 105 आहेत, ते काँग्रेस, राष्ट्रवादी मधूनच गेलेले आहेत. आता त्यांना सांभाळा. या भाजपच्या नेत्यांनी एक तरी शाळा काढली का? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Rajya Sabha Election : संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली याचं मला दुःख वाटतं: पंकजा मुंडे


राज्यात 30 जूनपर्यत कुठलीही प्रशासकीय बदली होणार नाही ; राज्य सरकारचा निर्णय