Raj Thackeray Dasara Melava 2024: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पॉडकास्टद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी या पॉडकास्टद्वारे केलं. मतदानाचे शस्त्र तुम्ही वर ठेवता आणि नंतर बाहेर काढून बोलता. मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असं करुन राष्ट्र उभं राहत नाही. आज संधी आलेली आहे  म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिलीत. या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.


दरवर्षी आपण दसऱ्याला सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. पण महाराष्ट्राचे सोने अनेक वर्ष लुटलं जात आहे. आम्ही फक्त एकमेकांना आपट्याची पाने वाटतोय. आपल्या हातामध्ये आपट्याची पाने सोडून दुसरं काही राहतच नाही आणि बाकीचे सगळं सोने लुटून चाललेत, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. तसेच आपल्या हातात मोबाईल आला, टीव्ही आला...म्हणजे प्रगती नाही. आजचा दसरा मेळावा खूप महत्वाचा आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुका आता आहेत, असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.


राज ठाकरेंनी मांडले 10 महत्वाचे मुद्दे- (10 important points raised by Raj Thackeray)


- महाराष्ट्राचं सोनं गेल्या अनेक वर्षांपासून लुटलं जातंय आणि आम्ही फक्त आपट्याची पानं वाटतोय...


- बाकीचे सर्व लोक सोनं लुटून जातायंत, पण आमचं दुर्लक्ष


- आजचा दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही...


- तुमच्यातला राग मला कधी दिसत नाही...त्याच-त्याच लोकांना तुम्ही निवडून देता...


- मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर शस्त्र बाहेर काढता...


- तुम्ही सर्वांना संधी देता, ज्यांना तुम्ही सांभाळलं त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली...


- शमीच्या झाडावरील शस्त्र काढण्याची हीच वेळ


- निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे...


- मी महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून स्वप्न पाहत आहेत. हे स्वप्न साकारण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र बनवणे हेच माझं स्वप्न आहे... 


- ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या...


संबंधित बातमी:


Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...


राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओ: