Sandeep Deshpande On Rahul Gandhi : शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) होणाऱ्या सभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलेही अपमान जनक वक्तव्य केल्यास राहुल गांधीना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याया यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra News) दाखल झाली आहे. तसेच येत्या 17 मार्चला या यात्रेचा समारोप होणार असून, काँग्रेसच्या (Congress) भव्य यात्रेचा समारोप मुंबईतील (Mumbai News) शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेनं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी हा इशारा दिला आहे. 


याबाबत बोलतांना मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, “ छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये  आतापर्यंत अनेक वाघांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकले आहेत. स्वतंत्र वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या दिग्गजानी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतल्या असून, त्यांच्या डरकाळी अनेकांनी ऐकले आहेत. मात्र, 17 तारखेला होणाऱ्या सभेमध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई  ऐकण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्राला राबणार आहे. त्याचबरोबर वाघाचं कातडे पांघरलेले लांडगे सुद्धा या सभेला असतील. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, असेही देशपांडे म्हणाले. 


अन्यथा महाराष्ट्रात त्यांची काही खैर ना....


छत्रपती शिवाजी पार्क मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. शिवाजी पार्क जवळच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहे, तुमचं म्हणणं मांडा, आमचं याला ना नाही. पण इथे येऊन मागच्या वेळीप्रमाणे सावरकरांबद्दल कुठलंही अपमान जनक वक्तव्य केल्यास, महाराष्ट्रातील 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तसेच या कोल्ह्यांबरोबर सामील झालेले जे हे लांडगे आहे, त्यांनी पण लक्षात ठेवावं. अन्यथा महाराष्ट्रात त्यांची काही खैर नाही, असे देशपांडे म्हणाले.


जनता महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करेल 


या सभेतून प्रचाराचा नारळ फोडा, अजून काय फोडायचं ते फोडा, आमचा त्याला विरोध नाही. आमचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्याबद्दल आहे. मागच्यावेळी देखील राहुल गांधी भारत जोडो यात्रा निमित्ताने महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल अपमान जनक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना आता ही पहिली वार्निंग आहे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करेल. सावरकरांबद्दल अपमान झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.


आदित्य ठाकरेंवर टीका...


शिवाजी पार्कवरील प्रदूषणाला जबाबदार आदित्य ठाकरे आहेत.  महापालिकेचे वॉर्ड अधिकारी किरण दिघावकर आहेत, त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही सांगितलं होतं शिवाजी पार्कवर माती टाकू नका, असेही देशपांडे म्हणाले. 



इतर महत्वाच्या बातम्या : 


Rahul Gandhi Sabha at Shivaji Park : ठाकरेंच्या होमग्राऊंडवर राहुल गांधींची सभा; 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य समारोप