नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेले संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परभणी हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सविस्तरपणे भाष्य केले. यावेळी फडणवीसांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh) वहीम असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यासंदर्भातही भाष्य केले. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरण सातत्याने लावून धरणाऱ्या सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 


बीड प्रकरणी मुख्यमंत्री जे बोलले, ते अतिशय चांगले उत्तर दिले आहे. आमचे समाधान झाले आहे. आयजी लेवल व न्यायालयीन चौकशी होईल. भुमाफिया, वाळूमाफिया, धमकी, खंडणीखोर या सगळ्यांवर कारवाई केली जाईल. ज्यांचा कोणाचा हात आहे, या सगळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्र्‍यांनी दिले. तसेच सरपंच संतोष देशमूख यांच्या परिवाराला १० लाखाची मदत जाहीर केली आहे. माझे बीड जिल्ह्यातील जनतेला सांगणं आहे की, 'आका'ने कोणा कोणावर अन्याय केला आहे. जमिनी बळकावल्या आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला पुढे यावे. एसपींची बदली करण्यात आली आहे. मी मागणी करणार आहे की, बीड जिल्ह्यात एक चांगला अधिकारी द्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. 


वाल्मिक कराड यांच्यावर आतापर्यंत खंडणीचा गुन्हा आहे. पण चौकशीत समोर आले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. यांच्यात आका असेल तर आका पण येईल आणि आकाचा आका पण येईल. धनंजय मुंडे का उपस्थित नाहीत, हे मला माहित नाही ते त्यांना विचारा, असेही सुरेश धस यांनी म्हटले.


मुख्यमंत्र्यांनी बीडच्या SP ना हटवलं


बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. मात्र, मविआचे नेते फडणवीसांच्या उत्तरावर समाधानी नाहीत.


आणखी वाचा


मोठी बातमी : वाल्मिक कराडला सोडणार नाही, पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द