मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण आठ खासदार निवडून आले आहेत. याच कारणामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढल्याचा दावा केला जातो. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) काही आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्येची अनेकजण म्हणतायत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी तसा थेट दावा केला आहे. यावरच आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या चालू असलेल्या चर्चांना चांगलीच हवा मिळाली आहे. 


जयंत पाटील यांचं एका वाक्यात उत्तर


शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आज त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. पत्रकारांनी त्यांना सध्या चालू असलेल्या आमदारांच्या इन्कमिंगच्या चर्चेवर प्रश्न विचारला. काही लोक तुमच्या संपर्कात आहेत, असं सांगितलं जातंय. या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड घटल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार स्वगृही परतणार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे खरंच काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न पत्रकाराने केला. यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढच सांगतो, असे जयंत पाटील म्हणाले. 


योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ


याबद्दल आम्ही आताच काही भाष्य करणार नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून लोकांची मनस्थिती बदलली आहे. त्यामुळे मी त्यावर आताच काही बोलणार नाही. सध्या फार घाई करणं योग्य नाही. सध्या थोडा वेळ जाऊद्या. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या मताची फार काळजी आहे. आमचे अनेक आमदार गेले पण आज जनतेने लोकसभा निवडणुकीत हा निकाल दिला. आम्ही योग्य वेळी योग्य ते करू, असे जयंत पाटील म्हणाले. 


हेही वाचा :


Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण


... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार


सुनील टिंगरे, संग्राम जगताप ते अण्णा बनसोडे, धनंजय मुंडे, अजित पवारांकडे किती आमदार, शरद पवारांच्या आमदारांची संख्या किती?