नागपूर: महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) खासदार म्हणून सर्वाधिक वाटा मराठा समाजाला मिळाला आहे का? राज्यातील निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये तब्बल 26 मराठा खासदारांचा (Maratha MPs) समावेश आहे. तर फक्त 9 खासदार हे ओबीसी समाजातील आहेत. 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातींचे, तर 3 खासदार खुल्या वर्गातील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण, मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन (Maratha Reservation), आणि त्यामुळे झालेला मराठा मतांचा ध्रुवीकरण याचा हा परिणाम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ही दुर्दैवी परिस्थिती असल्याचे सांगत महाराष्ट्रात सुरुवातीपासून राजकारणात मराठा वर्चस्व राहिला असून तो कायम राहिल्याचे मत व्यक्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मराठ्यांचा वर्चस्व असून तिथे तर ओबीसीना मानाचा, सन्मानाचा स्थान सुद्धा नाही.. तसेच ओबीसी समाज मध्यमवर्गीय असल्याने तो एवढी मोठी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळेच राज्यातील अनेक भागात मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत होते आणि मराठा खासदारांची संख्या जास्तच राहते असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
हळूहळू मात्र या स्थितीत बदल होतील. आज 48 पैकी 12 ते 13 खासदार ओबीसी आहे मात्र त्यापैकी काहीजण ओबीसी असूनसुद्धा ही ते राजकारणापायी स्वतःला ओबीसी म्हणत नाहीत. ते जनतेसमोर जाताना स्वतःला मराठा म्हणूनच जातात हे आमचे दुर्दैव असल्याचे तायवाडे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा जो आंदोलन झाला. त्याचा परिणाम निश्चितच निवडणुकीवर झाला आहे... आणि त्या आंदोलनामुळे ओबीसी ही संपूर्ण महाराष्ट्रभर एकवटला गेला. त्यामुळेच विदर्भ आणि कोकणात ओबीसी खासदार निवडून आले, असे मतही तायवाडे यांनी व्यक्त केले.
राज्यात निवडून आलेल्या जातनिहाय खासदारांची यादी
# मराठा खासदार महाविकास आघाडी
शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमप्रकाश निंबाळकर, डॉ कल्याण काळे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, संजय जाधव, बजरंग सोनवणे
# मराठा खासदार महायुती
स्मिता वाघ, नारायण राणे, श्रीकांत शिंदे, उदयनराजे भोसले, नरेश म्हस्के, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, संदिपान भुमरे, अनुप धोत्रे
# ओबीसी खासदार महाविकास आघाडी
प्रतिभा धानोरकर, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. प्रशांत पडोळे, अमर काळे, संजय दिना पाटील, सुरेश बाळ्या मामा म्हात्रे...
# ओबीसी खासदार महायुती
रक्षा खडसे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर
# एससी (SC) खासदार
बळवंत वानखेडे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रणिती शिंदे, वर्ष गायकवाड, श्याम कुमार बर्वे, डॉ शिवाजी काळगे
# एसटी (ST) खासदार
भास्कर भगरे, डॉ. हेमंत सावरा, डॉ. नामदेव कीरसान, गोपाल पाडवी...
# खुल्या वर्गातील खासदार
नितीन गडकरी, पियुष गोयल, अनिल देसाई
आणखी वाचा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....