Gulabrao Patil Vs Chimanrao Patil: शिंदे गटाचे आमदार चिमण पाटील (Chimanrao Patil) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यातील राजकीय वाद चर्चेचा विषय बनला असून मतदार संघातील एका घटने बाबत आपण आपली तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं आमदार चिमण पाटील यांनी म्हंटल आहे. चिमण पाटील यांची मुख्यमंत्री यांच्या कडील तक्रार पाहता शिंदे सरकारमध्ये सार काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे


राज्यातील सत्तांतर ही सर्वात मोठी क्रांतिकारक घटना भारतात घडली असून प्रत्येकाला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार आहे. राम हे सर्वांचेच आहते. शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात असून मुंबई महापालिका निवडणूकाचा या दौऱ्याशी काही संबंध नसून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर झाले असून सर्वात मोठी क्रांतिकारक घटना घडली आहे. एवढी शक्तीशाली घटना कोणीच केला नाही, असा प्रयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात घडला असून  राम हे सर्वांचे आहेत. प्रत्येकाला श्रीरामांच्या दर्शन घेण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्या बाबत दिली आहे


पाणी पुरवठा मंत्री व जळगांवचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्यात राजकीय सध्या वाद हे विकोपाला गेला असून शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी आता थेट गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटलांच्या विरोधकांना निधी मंजूर करून दिला असून त्याचं भूमीपूजनाच्या कार्यक्रमास मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे विरोधकांना बळ देत असून यातून पारोळा मतदारसंघात चुकीचा संदेश गेला असून याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम