मुंबई : राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-pune express way) महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि इतर आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. एकीकडे मिसिंग लिंकच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे वाहतूक आणखी जलद होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे. या मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर बोलतना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा आव्हानात्मकपणे असा हा प्रकल्प होता. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी याचं उदघाटन केलं. अतिशय विस्तारपूर्वक माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. मिसिंग लिंक नाही, आत्ता कनेकटिंग लिंक तयार झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासाची लिंक मिसिंग होती ती आत्ता आम्ही कनेक्ट केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी MSRDC (Maharashtra State Road Development Corporation) मंत्री नितीन गडकरी होते, त्यावेळी त्यांना सांगितलं १०-१० तास लागतात या घाटातून जायला. त्यानंतर पहिला एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस वे केला, अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. त्याचबरोबर यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. 

Continues below advertisement

Eknath Shinde: आज ज्यांना ट्राफिकमुळे त्रास झाला, ते सरकारला दुआ देतील

थोडासा आज ट्राफिक जाम झाला, आज ज्यांना त्रास झाला,आज ज्यांना ट्राफिकमुळे त्रास झाला, ते सरकारला दुआ देतील चांगलं काम झालं म्हणतील. आधीचं सरकार म्हणाले की, हे काम होणार नाही. जे काम होणार नाही. ते काम महायुती सरकार करत आहे. आजचा योगायोग देखील आहे, ज्याचं भूमिपूजन मी केलं...त्याचं उद्घाटन आम्ही दोघे करत आहोत, काही वर्क फ्रॉम होम वाले लोक मध्ये आले होते, ते सगळ्यांना म्हणाले स्टे होम. नंतर परत आम्ही दोघे आलो आणि हे काम पूर्ण झालंय, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

Eknath Shinde: घाट सेक्शन बाजूला राहील आणि प्रवास होईल

बाळासाहेब यांच्या जन्म शताब्दी वर्षाला मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होतोय याचा आनंद होतो आहे. घाट सेक्शन बाजूला राहील आणि प्रवास होईल. अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होते. पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे, लोक काम करतात म्हणून आपल्याला लोक आशीर्वाद देतात असंही पुढे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पाचा उल्लेख 'इंजिनिअरिंग मार्वल' (अभियांत्रिकी चमत्कार) असा केला. हा प्रकल्प अतिशय आव्हानात्मक होता आणि १ मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर त्याचे लोकार्पण होणे ही ऐतिहासिक बाब असल्याचे शिंदेंनी सांगितले.

Continues below advertisement

Eknath Shinde: नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले

या पुलाच्या कामाला सुरुवात झाली, त्यावेळी देखील मी मंत्री होतो एमएसआरडीसीचा, आज लोकार्पणाच्या प्रसंगी देखील तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी उपमुख्यमंत्री असलो तरी एमएसआरडीसीचं खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे हा योगायोग आहे, आम्ही केलेलं भूमिपूजन त्याच प्रकल्पाचं लोकार्पण देखील आम्हीच करतो, हे महत्त्वाचं आहे, तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, त्याच्यामुळे थोडा थंड पडला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम, पण त्यानंतर मग चार वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे, तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला, पुन्हा या रस्त्याला चार वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री असताना परत जोर लावला आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंक ला ज्या-ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर केल्या, मला आपल्याला सांगताना या प्रकल्पाचा जे काही चॅलेंज होतं आणि अडचणी होत्या ते देवेंद्रजींनी सांगितलं, एमएसआरडीसी आणि ज्यांनी हे काम केलं त्यांना फार धन्यवाद दिले पाहिजेत, कारण या प्रकल्पामुळे फक्त मुंबई पुणे जाण्यासाठी 40 मिनिटे वेळ वाचणार आहे, मुंबई, पुणेच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रात जाताना ही वेळ वाचणार आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde: नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ही केवळ 'मिसिंग लिंक' नसून 'कनेक्टिंग लिंक' आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची जी लिंक 'मिसिंग' झाली होती, ती या प्रकल्पाद्वारे पुन्हा जोडली गेली आहे . मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या योगदानाचा उल्लेख केला. घाटातील आठ-दहा तासांचा प्रवास अडीच तासांवर आणण्याचे काम त्या काळात झाले होते. घाटातील ट्रॅफिक जाममुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि डोकेदुखी आता या नवीन लिंकमुळे कायमची संपेल. टायगर व्हॅलीतील हा रस्ता प्रवाशांसाठी 'रामबाण उपाय' ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात रुंद बोगदा (Widest Tunnel) आणि भारतातील सर्वात उंच व्हायडक्ट (Viaduct) आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

एवढ्या उंचीवर काम करणे सोपे नव्हते. सुरुवातीला उंची बघून मजूर पळून जायचे, पण त्यांनी जिद्दीने हे काम पूर्ण केले, अशा शब्दांत त्यांनी कामगारांचे आभार मानले."जे पूर्वीच्या लोकांनी होणार नाही म्हणून रद्द केले होते, तेच आम्ही करून दाखवले. यालाच महायुती सरकार म्हणतात," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.