Marathwada MLA List :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात 2019 सालच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित असल्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2019 साली भाजप (BJP) आणि शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेना पक्ष 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.


लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  यांची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला छत्रपती संभाजीनगर वगळता एकही जागा जिंकता आलेली नाहीत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? हे आता काळच ठरवणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात कोणाचे वर्चस्व कुणाचे आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


लातूर जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. लातूर ग्रामीण  -  धीरज देशमुख (काँग्रेस)
2. लातूर शहर -  अमित देशमुख (काँग्रेस)
3. अहमदपूर - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
4. उदगीर         - संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
5. निलंगा        -  संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
6. औसा        -  अभिमन्यू पवार (भाजप)


परभणी जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. जिंतूर - मेघना बोर्डीकर (भाजप)
2. परभणी  - राहुल पाटील (शिवसेना)
3. गंगाखेड - रत्नाकर गुट्टे (रासप)
4. पाथरी  - सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)


जालना जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी)
2.परतूर  -   बबन लोणीकर (भाजप)
3. जालना  - किसनराव गोरंटियाल (काँग्रेस)
4. बदनापूर  - नारायण कुचे (भाजप)
5. भोकरदन  - संतोष दानवे (भाजप)


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिवसेना)
2. कन्नड -    उदयसिंह राजपूत शिवसेना
3. फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजप)
4. औरंगाबाद मध्य - प्रदीप जैसवाल (शिवसेना)
5. औरंगाबाद पश्चिम -  संजय शिरसाठ (शिवसेना)
6. औरंगाबाद पूर्व -  अतुल सावे (भाजप)
7. पैठण  -  संदीपान भुमरे (शिवसेना)
8. गंगापूर - प्रशांत बंब (भाजप)
9. वैजापूर - रमेश बोरनारे (शिवसेना) (आघाडी)


बीड जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)
2. माजलगाव -  प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
3. आष्टी  - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
4. बीड -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
5. केज - नमिता मुंदडा (भाजप)
6. परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)


धाराशिवमधील आमदारांची यादी 


1. उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
2. तुळजापूर -  राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
3. उस्मानाबाद - कैलास पाटील (शिवसेना)
4. परांडा  - तानाजी सावंत (शिवसेना)


नांदेड जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. किनवट - भीमराव केरम (भाजप)
2. हदगाव -  माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
3. भोकर  - अशोक चव्हाण (काँग्रेस)
4. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना)
5. नांदेड दक्षिण  - मोहन हंबर्डे (काँग्रेस)
6. लोहा  - श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
7. नायगाव  - राजेश पवार (भाजप)
8. देगलूर  -  रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)  - निधन, जितेश अंतापूरकर (पोटनिवडणुकीत विजयी)
9. मुखेड -  तुषार राठोड (भाजप)


हिंगोली जिल्ह्यातील आमदारांची यादी 


1. वसमत  -  चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
2. कळमनुरी - संतोष बांगर (शिवसेना)
3. हिंगोली  -  तानाजी मुटकुळे (भाजप)


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापुरात शाळांना सुट्टी; पण मुख्याध्यापक; शिक्षकांनी हजेरी लावायची