Devendra Fadnavis on Jarange Maratha Protest : आंतरवाली सराटीतील (Antarwali Sarathi) आंदोलकांवर लाठीचार्ज (Maratha Protest) (Lathi Charge) झाल्यामुळे मराठा आंदोलन (Maratha Reservation Agitation) चिघळलं असा, आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनातही या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि आंदोलक यांच्या गोंधळ पाहायला मिळाला. आंतरवालीतील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला, याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना दिलं आहे.


आंतरवालीतील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला? 


लाठीचार्ज का झालं याचं कारण देताना फडणवीसांनी सांगितलं की, पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आंदोलन चिघळलं असा विरोधकांचा आरोप आहे. लाठीचार्जमुळे झालं असेल, पण लाठीचार्ज का झाला, आता षडयंत्र बाहेर येतंय. आता हे लक्षात येतंय. कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगेंना परत आणणारे कोण आहेत? त्यांच्या घरात जाऊन भेटणार कोण आहेत? कुणाकडे बैठक झाली, हे आरोपी सांगत आहेत, कुणी दगडफेक करायला सांगितलं ते. पोलीस आपले नाहीत का? आपल्या पोलिसांनी मारायचं आणि आपण गप्प राहायचं, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.


जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा


मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत हिंसक वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ''त्यांना माहिती आहे मी निष्ठावान आहे, हरमखोर आहे, म्हणून षडयंत्र रचत आहेत. फडणवीस मला मारायला तयार आहेत. मी हसत मारायला तयार आहे. असं मरण यायला भाग्य लागतं, मी मरण पत्करायला तयार आहे. मी पहिल्यापासून सांगितलं आहे. शांततेत आंदोलन करणारा आमचा समाज आहे. काल सुद्धा मी तेच सांगितलं मी एकटा जातोय, कोणीही उद्रेक करायचा नाही. त्याला महाराष्ट्र बेचिराख करायचा आहे. आपण होऊ द्यायचं नाही. मी तुम्हाला भेटायला येतोय आणि नाही येऊ दिलं तर, जेलमधून तुमच्यासोबत आहे'', असं जरांजेंनी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : मनोज जरांगेंना घरात येऊन भेटणारे कोण आहेत? हे शोधलं पाहिजे : फडणवीस



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CM Eknath Shinde : जरांगेंच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली; मुख्यमंत्र्यांचा जरांगेवर घणाघात