Manoj Jarange on Maratha March to Mumbai: राज्यात मराठ्यांच्या पुढे येण्याची कोणाची मजल आहे का? आम्ही शांत बसलो आहोत म्हणून फायदा उचलू नका. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मी तुम्हाला सांगतोय की, मराठ्यांना त्रास देऊ का. एकदा मराठा समाजाने अक्राळविक्राळ रुप धारण केलं की, कोणीही थांबवू शकत नाही, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. ते रविवारी बीडमधील सभेत बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला. आमच्यावर वार करायचं थांबवा. तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना डाग लागू शकतो. तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंय म्हणून समजा पण आता तुमच्या जिंदगीतील पश्चातापाचा दिवस येऊ देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारचा उल्लेख 'एक तात्या अन् दोन आप्पा', असा केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मोठं घर सोडून तुमच्याकडे आले. देवेंद्र फडणवीस यांनी जातींमध्ये भांडणं लावली. पण काहीच उपयोग होत नाही. देवेंद्र फडणवीसांनी आता मराठ्यांच्या नादी लागू नये. गुपचूप आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मुंबईतील सर्व समाज बांधव सज्ज झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना आता जागा राहिलेली नाही. त्यांनी अनेक जातींमध्ये भांडणं लावूनही उपयोग होत नाही. धनगर समाजाला आणि लाडक्या बहि‍णींनाही देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Maratha Morcha in Mumbai: मनोज जरांगे पाटलांचं मुंबईकरांना आवाहन

मुंबई ही न्यायाची भूमी आहे. मुंबईकरांनो आम्ही चार महिन्यांपासून सांगतोय, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा. आम्ही तुमची लेकरं आहोत. आम्ही तिकडे न्यायासाठी येतोय, कोणाला त्रास द्यायला येत नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा आणि आमचा गणपती बाप्पा सारखाच आहे. उलट आम्ही तुम्हाला मदत करु. आम्ही गणेशोत्सवात तुम्हाला 1 लाख स्वयंसेवक देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण दिल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे यांचा एल्गार

सत्ता बदलत असते, त्याच्या जीवावर उड्या मारू नका; मनोज जरांगेंचा बीडमधून एल्गार, देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान