Devendra Fadnavis Reaction On KKR Controversial Post: छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' (Chhaava Movie) 4 दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. पण फक्त चारच दिवसांत त्यानं विक्रमांचे डोंगर उभे केले आहेत. विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर आणि लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा'ची जगभरात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

'छावा' सध्या फक्त देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांकडून तर कौतुकाचा वर्षाव होतच आहे, पण चित्रपट समीक्षकही (Film Critic) 'छावा'चं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. पण, अशातच एका बॉलिवूड अभिनेत्यानं (Bollywood Actor) केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे खळबळ माजली आहे. बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (Kamaal R. Khan) यानं छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट केली. केकेआरच्या वादग्रस्त पोस्टनंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विकिपिडीयाला (Wikipedia) मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत. 

बॉलिवूड अभिनेता केकेआरनं 17 फेब्रुवारीला एक ट्वीट केलं. केकेआरचं हे ट्वीट 'छावा' चित्रपटासंदर्भात आहे. केकेआरनं 17 फेब्रुवारीला केलेल्या ट्वीटमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या आणि आक्षेपार्ह्य गोष्टी लिहिलेल्या. काही काळातच केकेआरनं 'छावा'संदर्भात केलेली पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपीडियाला छत्रपती संभाजी महाराजांबाबतची आक्षेपार्ह्य माहिती हटवण्याचे आदेश दिले. 

विकीपीडियाला दिलेल्या निर्देशांबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? 

विकीपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह्य मजकूराबाबत बोलाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत."

"मी सायबरच्या आयजींना विकिपीडियावरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांना विकिपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडिया भारतातून चालवले जात नाही. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करण्याऐवजी त्यासंदर्भात काही नियम तयार करा, असा सल्ला त्यांना देऊ शकतो...", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, 'छावा'मधून छत्रपती शंभू राजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर सादर करण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शिक 'छावा' सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विक्कीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकजणांना तर विक्कीच्या रुपात छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis:तत्काळ कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे सायबर पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादवांना आदेश

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Worldwide Box office Collection: विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर