Manoj Jarange on Rahul Gandhi, जालना : "भारत जेव्हा सर्वांना समान न्याय देणारा देश होईल, तेव्हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार होऊ शकतो. आज ती स्थिती नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते अंतरवाली सराटीत बोलत होते. 


सत्ता तर आली पाहिजे, यायच्या आधीच कुठून रद्द करतो


राहुल गांधींबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, काय करायचं कर म्हणा. सत्ता तर आली पाहिजे, यायच्या आधीच कुठून रद्द करतो. त्याची सत्ता तर आली पाहिजे ना. परदेशातून बोलला की समुद्रात उभा राहून बोलला मला काय माहिती? त्यांचा राजकीय मामला आहे. त्याचा आमच्याशी काही संबंध नाही.


 देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत


आमदार राजेंद्र राऊतांबाबत बोलताना पाटील म्हणाले, गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे,समाज हुशार आहे, समाज सगळं बघतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना. दिवस जवळ आले आहेत. राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे ,राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले किती गेले, हे सगळे भाजप संपणार आहे.


लक्ष द्यावं म्हणून कधी करणार नाही, एक वर्ष झालं मी आंदोलन समाजासाठी करतो. मी कसला विचार करत नाही मी कोण येणार आहे, कोण येणार नाही. थोडे दिवस थांबा तुमचा राजकीय करियर बाद करतो. प्रसाद लाड येडा झाला आता. माझं काम आहे, कर्तव्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मी करतोय, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. 


देवेंद्र फडणवीस फक्त फोडाफोडीत हुशार आहेत


मी कोणत्याही आंदोलनाला डायरेक्ट बसून जातो. कोणी यावं म्हणून मी आंदोलन करत नसतो. असलं रडकं सरकार केव्हाच बघितलं मी नाही. फडणवीस साहेब लय हुशार आहेत, चाणक्य आहेत असं वाटायचं. ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत. फडणवीस साहेब तुम्हाला इमानदारीने सांगतो तुम्हाला विरोधक, शत्रू मानलेलं नाही. तुम्ही आरक्षण देऊन टाका, असंही जरांगे म्हणाले. 


Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार