Manoj Jarange: राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या यादीत अबू आझमींच्या वक्तव्याची भर पडली आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले.  औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणत गोडवे गाणाऱ्या अबू आझमींच्या अधिवेशनातील निलंबनानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. औरंगजेबाची कबर पाडा म्हणत शिवप्रेमींसह भारतीय जनता पक्षाच्या खासदारांपर्यंत आक्रमक वातावरण असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका मांडलीय. औरंगजेबाची कबर काढा. गेली 40 वर्ष कबर काढायला जमले नाही, आता महापालिकेच्या तोंडावर असे विषय काढतात. मोठे मोठे लोक बोललेत. मी काय सांगू. फेका म्हणायची काय गरज आहे. कबर काढायचे असेल तर काढा. मीडिया ट्रायल करू नका अशी भूमिका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी घेतली आहे. 

औरंगजेबाची कबर काढा, गेली 40 वर्ष...: मनोज जरांगे

मोठे मोठे लोक बोलले आता मी काय सांगू. कबर काढून फेका म्हणायची काय गरज आहे? काढायचे असेल तर काढा. इथल्या मुस्लिमांना तरी काय करायचे कबरीचं? तो मुस्लिमांचा तरी सगळा सोयरा होता का.. उलट ते ही काढू लागतील. बाबरी पडली तेव्हा सांगितले थोडी होते. करणारे सांगत नसतात. असा सूचक वक्तव्य  त्यांनी केलं. जनतेच्या डोळ्यांनी देखत तुम्ही दुजाभाव करत असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.गेली 40 वर्ष कबर काढायला जमले नाही, आता महापालिकेच्या तोंडावर असे विषय काढतात. निवडणुकीच्या तोंडावर सरकार औरंगजेबाची कबर पाडू अशी नवनवी पिल्ले आणत आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले. 

जालन्यातील चटके प्रकरणावरूनही मनोज जरांगे आक्रमकपणे बोलत होते. अधिवेशन संपेपर्यंत शांत आहोत त्यानंतर शांत राहणार नाही मराठा कुणबी एकच आहे तात्काळ कारवाई सुरू करावी आणि प्रमाणपत्र द्यावे शिंदे समिती काम करत नाही गुन्हे देखील मागे घेतले जात नाहीत याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा मराठा आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा मराठा कुणबी एकच असल्याचा आदेश काढावा असेही मनोज जरांगे म्हणाले .

छगन भूजबळांवर टीका

जालन्यातील चटकेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. देवदेवतांचा विटंबना झाली आहे. प्रशासन अधिकारी यांच्यावर संशय निर्माण होईल असे काम करू नयेत, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना देखील उत्तर दयावे लागेल.चटके दिले त्याच समर्थन करत नाही.. धर्म देव आणि महापुरुष यावेतिरक काही लोकांना आपली जात महत्वाची वाटते. छगन भुजबळ सारखे माणसे देव महापुरुष यांच्यापेक्षा जातीवादाला महत्व देतात.... चूक झाली तरीही आमचा बाब्या चांगला....आम्हाला जातीवादी म्हणतात, आम्ही कुणाचं समर्थन करत नाही आम्ही फक्त आरक्षण मागत आहे,, भुजबळ स्वप्नां पूर्ण होणार नाही, त्याला मराठा ओबीसी मारामारी लावायची आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.