बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच सीआयडीकडे असलेल्या पुराव्यांनुसार आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले आहेत. अशातच तिरंगा हॉटेलवरचा केलेलं जेवण आणि त्याच ठिकाणी देशमुखांच्या हत्येचा रचलेला कट यामुळे वाल्मीक कराडच्या गळ्याला फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. सीआयडीकडे या प्रकरणातील सर्वच महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याचबरोबर चाटे, सुदर्शन घुलेचा संवादही जबाबात उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एकजण केज तालुक्यातील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता. चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक 'शब्द' आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी आहेच मात्र तो या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचा समावेश आहे. त्याच्या जबाबाच्या आधारे सर्व बाबी समोर आल्या आहेत.
6 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग येथील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये सुदर्शन घुले दिसत होता. 8 डिसेंबर 2024 रोजी घुले आणि अन्य एकजण टाकळी येथे भेटले. यावेळी घुले याने विष्णू चाटे याचा फोन आला असून तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावल असल्याचं सांगितलं. चाटे हा अगोदरच तेथे होता. चाटे याने सुदर्शन घुले याला चांगलेच झापले होते.
देशमुखांना गुन्हा दाखल करण्याचा दिला होता सल्ला
मारहाणीचा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने सरपंच संतोष देशमुख यांना, 'तुम्ही सुदर्शन घुले आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत' असा सल्ला दिला होता. यापूर्वी मलाही कराडने धमकी दिली होती. मी विरोध केल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवले, असे जबाबात त्याने सांगितले आहे.
काय झाला होता संवाद?
'आम्ही कमवायचे, तुम्ही वाटोळे करायचे, स्वतःची व आमची पण इज्जत घालवलीस. तुला प्लँट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलास' असं चाटे म्हणाला. त्यावर सुदर्शन घुले म्हणाला, 'आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने कंपनी बंद करू दिली नाही.' यावर चाटे म्हणाला, 'वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.'
पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले
गोपनीय साक्षीदार क्रमांक 1
तिरंगा हॉटेल वर जेवण करताना.. गोपनीय साक्षीदार सोबत होता. त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामधील संवाद..
विष्णु चाटे - आम्ही कमवायचे आणि तुम्हीही वाटोळे करायचे. स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवले होते तो तुम्ही बंद केला नाही. उलट हात हलवत परत आलात.
सुदर्शन घुले - आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तेथे संतोष देशमुख आला त्याने आम्हाला कंपनी बंद करून दिले नाही मासाजोग च्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिले..
त्यानंतर विष्णू चाटे- वाल्मिक अण्णाचां निरोप आहे हे काम बंद केले नाही, खंडणी दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केला तर काय परिणाम होतो.
विष्णू चाटे - वाल्मीक अन्नाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुख कायमचा धडा शिकवा..
सुदर्शन घुले- आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो..
हा जवाब गोपनीय साक्षीदाराने दिलेला आहे..
दुसरा गोपनीय साक्षीदार..
6 डिसेंबर 2024 रोजी आवाजा कंपनी मध्ये झालेल्या मारहाणी नंतर.. संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितले होते तुम्ही सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत.. वाल्मीक काराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. या अगोदर मलाही वाल्मीक कराड यांनी धमकी दिली होती खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले होते...
तिसरा गोपनीय साक्षीदार
वाल्मीक कराड यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या आहे. याच टोळ्याच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो.
दहशतीमुळे वाल्मीक कराड यांच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही.. वाल्मीक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले हे त्यांच्याच टोळीतील लोक होते..
चौथा गोपनीय साक्षीदार
या गोपनीय साक्षीदाराने बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून विनाकारण अडकविण्यात आले त्यामुळे तब्बल 90 दिवस बीड जिल्हा कारागृहात बंदी म्हणून राहावे लागले.
वाल्मीक कराड याची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून. त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वाल्मीक करण्याची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी ठाण्याला जायची हिंमत करत नाहीत..
पाचवा गोपनीय साक्षीदार
प्रतीक घुले व सुधीर सांगळे हे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची गावात व परिसरात मोठे दहशत आहे. तिघेही वाल्मीक कराड यांची सांगण्यावर खंडणी गोळा करायचे काम करत.