Manoj Jarange on Raj Thackeray, जालना : धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी  असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, या आंदोलनाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


मनोज जरांगे काय काय म्हणाले?


मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना नाव न घेता राज ठाकरे यांच्यावरती टीका केली. आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये, त्यांच्यापुढे आंदोलन करण्याचे आणि त्यांना भेटायची काय गरज आहे, असा सवालही जरांगेंननी केलाय. गोरगरीब जनतेशी खेळणारे लोक असून आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 


दरम्यान मनोज जरांगे यांना  शरद पवार यांनी उभं केलं असल्याच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आपण प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. राजकारण्यांना दाबायची हीच संधी आहे असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय. 


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मनोज जरांगे यांनी बांगलादेशच्या परिस्थितीवरून धडा घेण्याचं अवाहन सरकारला केल आहे. आरक्षणाचा प्रचंड मोठा आक्रोश आहे. सर्वसामान्यांना त्रास दिल्यावर असं होतं हे सरकारने समजून घ्यावं. मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असेही जरांगे म्हणाले. 






धाराशिवमध्ये आत्तापर्यंत काय काय घडलं? 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असताना आरक्षणाबाबत टिप्पणी केल्यानंतर मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, राज ठाकरे यांनी वेळ नाकारल्यानंतर मराठा आंदोलक थेट हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज ठाकरे स्वत: हॉटेल बाहेर आले. तुम्हाला भेटतो म्हणाले. मात्र, अद्याप धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा समाजातील वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही.  पाच आंदोलकांना राज ठाकरेंच्या भेटीसाठी नेण्यासाठी पोलिसांची तयारी आहे. मात्र आंदोलक मीडियाला सोबत नेण्याची मागणीवर ठाम आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकातील वाद थांबता थांबेना,धाराशिवमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला,पोलिसांची माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की