Manoj Jarange on Devendra Fadnavis, तुळजापूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करणार का? असा सवाल पत्रकारांनी मनोज जरांगे यांना पंढरपूर दौऱ्यावेळी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, होऊ तर दे आधी, .. तुम्हालाच फार घाई झाली आहे, असं जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याने पुन्हा उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे . आज मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर नंतर पंढरपूर येथे येऊन विठुरायाचे दर्शन घेतले . यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर तुम्ही तुम्ही त्यांचे अभिनंदन करणार का असा प्रश्न विचारल्यावर ती मुख्यमंत्री तरी होऊ देत , तुम्हालाच त्याची फार घाई झाली आहे असा टोला जरांगे यांनी लगावला. एका बाजूला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण येणार हा संभ्रम अजूनही कायम असून भाजप मधूनच विविध नेत्यांची नावे समोर येत असताना आज मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा आंदोलन पेटणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रात सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून बहुजन येऊ दे हिंदुत्ववादी येऊ दे किंवा पुरोगामी विचाराचा येऊ दे , आजवर 75 वर्षात गोरगरिबांना कसलेच सुख मिळाल नाही ,असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. गोरगरिबांच्या प्रश्न सोडवले नाहीत तर ही जनता मानगुटीवर बसेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. या निवडणुकीत जरांगे इफेक्ट जाणवला नाही अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर मात्र जरांगे भडकले आणि आम्ही निवडणुकीतच नव्हतो त्यामुळे तो प्रश्नच येत नाही . मी समाजाला वेठीस धरलं नाही तर त्यांना ज्यांना पाडायचे त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा असे सांगितले होते. त्यानुसार समाजाने तसे केले असे उत्तर जरांगेंनी दिले.
मी जर रिंगणात असतो आणि माझं समीकरण जुळलं असतं तर यांचा सुपडा साफ केला असता. निकाल लागल्यानंतर जवळपास 30- 32 आमदार अंतरवालीत येऊन भेटून गेले. सत्ता स्थापनेनंतर अजूनही येथील असे सांगत आजही सर्वजण आपल्याकडे येतात असे संकेत दिले. आता होणारे आमरण उपोषण हे सामूहिक असून ते आंतरवाली सराटी येथे होणार आहे. मात्र समाजातून हे उपोषण मुंबईत करण्याबाबत आग्रह केला जात आहे. सध्या तरी यावर निर्णय झाला नसून हे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यावर निर्णय केला जाईल असे जरांगे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदी कोणीही असले तरी आम्ही आरक्षण घेणार आणि तेही ओबीसी मधूनच असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या