Ajit Pawar and Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिक घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक (Nashik news) जिल्हा न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. तर याबाबत कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात हजर राहणे अपेक्षित होते, मात्र ते अटक टाळण्यासाठी कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. राठोड यांनी कोकाटेंच्या अटकेसाठी अर्ज दाखल केला आहे. आता कोकाटे यांच्या बाबतीत रेकॉर्ड तपासणे काम करून पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे.
Nashik news: कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अटक वॉरंट निघो ना निघो नैतिकताला धरून...
कायदेशीर प्रक्रियाप्रमाणे अटक अटळ आहे, त्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई होईल. आरोपीने गैरवर्तन केले आहे, त्यांनी न्यायालय समोर हजर राहणे अपेक्षित होते पण ते हजर राहिले नाहीत. आम्ही उच्च न्यायालयात देखील ही बाजू मांडणार आहे, मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, त्यांनी दखल घेऊन कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अटक वॉरंट निघो ना निघो नैतिकताला धरून राजीनामा द्यावा लागतो. न्याय होताना दिसत नाही, त्यामुळे आम्हाला अर्ज करावा लागत आहे, न्यायालय आम्हाला न्याय देईल याचा विश्वास वाटतो असंही आशुतोष राठोड यांनी म्हटलं आहे.
Nashik news: कोकाटेंचा राजीनामा अटळ
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिक घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक (Nashik news) जिल्हा न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, दोन वर्षांची कारावासाची शिक्षा असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे, तर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची, ते सांगा? असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी केल्याची माहिती आहे. हायकोर्टाने स्थगिती दिली, तरच कोकाटेंचे मंत्रिपद वाचू शकते. पण, तसे न झाल्यास कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे, ते सांगा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरील भेटीत अजितदादांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nashik news: माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटसाठी कोर्टात अर्ज
माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Manikrao Kokate news: माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.