जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) दिल्लीत गेले म्हणजे ते भाजपमध्ये (BJP) जात आहे, असे म्हणता येत नाही, मात्र ते भाजपामध्ये आले तर ते नेते राहतील, मात्र बूथ प्रमुखाला ते ज्युनियर राहतील, अशा प्रकारची खोचक प्रतिक्रिया भाजप आमदार मंगेश चव्हाण  (Mangesh Chavhan) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे दिल्लीला गेल्याच्या नंतर ते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला आहे.


भाजप आमदाराची मंगेश चव्हाण यांची खोचक प्रतिक्रिया


एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा होत आहेत ते त्यांच्या कामाच्या निमित्ताने दिल्ली गेले असतील,दिल्ली गेले म्हणजे भाजपामध्ये जाण्यासाठीच गेले, असं म्हणता येणार नाही. मात्र एकनाथ खडसे भाजपामध्ये आले तर ते नेते असतील आणि ते बूथप्रमुखालाही ज्युनिअर असतील असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. अनेक नेते भाजपामध्ये आले तसे खडसे भाजपामध्ये आले तर, त्यांचं स्वागत केलं जाणार नाही असं होत नाही. पक्षाचे जे काम असेल ते त्यांनी करावं, असंही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.




खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अचानक दिल्लीवारी केल्याने जळगाव जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. गेल्या अनेक दिवस पासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत राहिल्या आहेत. खडसे अचानक दिल्लीला गेल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात तातडीने दिल्ली रवाना झाल्याच्या चर्चा आहेत.


भाजपत प्रवेश करण्याबाबत खडसे काय म्हणाले?


खडसे भाजपात जाणार अशी चर्चा असताना या संदर्भात यांनी  स्वतः प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसे यांच्या शी फोनवर विचारणा केली असताना त्यांनी सांगितलं आहे की, शरद पवार यांच्यासोबत बैठक असल्याने त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात देखील काम असल्याने आपण दिल्लीला गेल्याचं खडसेंनी म्हटलं. खडसे पुढे म्हणाले की, भाजपामध्ये जाणार असल्यास आपल्याला नक्की कळविणार असल्याचंही खडसे यांनी म्हटंल आहे, मात्र गेल्या काही दिवसात एकनाथ खडसे यांच्या हालचाली पाहता त्यांच्या विषयी राजकीय क्षेत्रात मात्र विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.




महत्त्वाच्या इतर बातम्या :

Unmesh Patil : भाजपकडून नाराज उन्मेश पाटलांच्या मनधरणीचा प्रयत्न, उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता; कोण आहेत उन्मेश पाटील?