Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 निश्चित झालेत तर 2 जागांवरुन अजूनही तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. कारण ठाण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatsh Shinde) यांच्या प्रतिष्ठेची असल्याने सेना ही जागा सोडण्यास तयार नाही. ठाणे (Thane) आणि नाशिक (Nashik) सोडून संभाव्य जागावाटप महायतीचे जागावाटप कसे असेल याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी जागा 


कल्याण 
दक्षिण मुंबई 
दक्षिण मध्य मुंबई 
उत्तर पश्चिम मुंबई 
पालघर 
मावळ 
रामटेक 
कोल्हापूर 
हातकणंगले 
बुलडाणा 
शिर्डी 
हिंगोली
यवतमाळ वाशिम 


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जागा  


बारामती
शिरूर 
रायगड
परभणी (महादेव जानकर)


बाकीच्या जागा भाजप


नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन रस्सीखेच 


सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे आहेत. ते ठाकरे गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. शिवाय या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ देखील आहे. दुसरीकडे नाशिक जागा तिन्ही पक्ष स्वतः कडे खेचण्याच्या तयारीत आहेत.  विद्यमान स्थितीत हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचा दावा यांनी केलाय. शिवाय हेमंत गोडसेंनी काल ठाण्यात शक्ती प्रदर्शन करत नाशिकची जागा खेचून आणण्यासाठी आग्रह धरलाय. काल रात्री नाशिकचे सेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि स्वतः हेमंत गोडसे हे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.


नाशिकमध्ये कोणाची ताकद किती?


नाशिकच्या जागेवर भारतीय जनता पक्षानेही दावा ठोकलाय. कारण भाजपचे नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 आमदार आहेत. त्यामुळे भाजप पूर्ण ताकद वापरून ही जागा आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता शिवसेनेची ताकद इथे कमी असल्याने, याच मुद्द्यावरून ही जागा राष्ट्रवादी आणि भाजप स्वतः कडे घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या जागेसाठी मी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरणार, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


उपरे विरुद्ध बाहेरचा वाद इरेला पेटला, मी सालगडी म्हणून सोलापूरकरांची सेवा करेन, राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना जशास तसं उत्तर