Mahayuti Rally Shivaji Park Mumbai devendra fadanvis : लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभा सुरु आहे. राज ठाकरे, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह महायुतीचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर होमग्राऊंडवरच शाब्दिक हल्ला केला आहे. 'बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धटवराव असे शब्द वापरल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचे भाषण होत नाही. मला बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना आठवतेय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. काल परवा उद्धव ठाकरे देखील ही घोषणा देत होते... आता इंडिया आघाडीमुळे देत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.'
मोदींनी 140 कोटी भारतीयांना लस दिली -
कोविडचा तो काळ आठवा, त्या काळामध्ये आपल्या नातेवाईंकासोबत संबंध दाखवत नव्हते. काय होईल ही चिंता होती. भारतामध्ये 40-50 कोटी लोकं मरतील, असे जगातील लोकं म्हणत होते. चारच देशांनी कोविडची लस तयार केली होती.त्यांच्याकडे लस मागितली तर ते म्हणतील आधी आमच्या लोकांना लस देतो अन्यथा ते मरतील. त्यानंतर मोदींनी देशातील शास्त्रज्ञाना एकत्र केले. लस तयार करणारा भारत पाचवा देश ठरला. मोदीजी कोविडची लस देत होते, त्यावेळी मुंबईत उद्धवजीच्या नेतृत्वात खिचडीचा घोटाळा चालू होता. रेमडिसिव्हर, ऑस्किसज घोटाळा चालू होता. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण काय असते, ते आम्हाला समजलं...कोविड बॉडी बॅगचा घोटाळा यांनी केला. खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो.. मोदी एकीकडे सेवा करत होते, आणि हे चोरी करत होते. यांना कुठेतरी जबाब मागावा लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
निवडणूक आले की नवीन जुमले सांगितले जातात, हे आता म्हणतात उद्योग पळवले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा गुजरात पहिल्या स्थानावर होता,. पण पुढचे पाच वर्षे महाराष्ट्र पहिल्या स्थानावर होता. आपल्यानंतरचे चार राज्य एकत्र केले तरी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यावर्षी कर्नाटक, दुसऱ्यावर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर आले. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
"तुम्ही सत्तेत असताना वसूली केली. तुमचेच पोलिस होते. वाझेनं बॅाम्ब ठेवला होता, खून केला होता आणि तरी उद्धव ठाकरे म्हणतात वाझे काय लादेन आहे का ?" असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल -
मुंबईवर हल्ले झाले.. करकरे साहेब, कामटे साहेब असतील ... ज्यांनी मुंबईसाठी जीव दिला.. उज्वल निकमांना तिकिट दिल्यानंतर नालायक काँग्रेसवाले म्हणतात... निकमांनी काँग्रेसचा अपमान केला. कसाबने करकरेंना मारलेच नाही. मतांसाठी शहिदांचा अपमान करु नका.. इंडिया आघाडी कसाबसोबत आहे, आम्ही उज्वल निकम यांच्यासोबत आहोत.
ठाकरेंवर टीका
आता आपल्याला लोकं मत द्यायला तयार नाहीत, आपली मतं कमी झाली, हे लक्षात आल्यावर त्यांनी लांगुलचालन सुरु केलेय. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार गरिबांचा आहे. मोदींनी धर्म अथवा जातीत भेदभाव केला नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुहदयसम्राट बोलायचं सोडून दिलंय… जनाब नावांपुढे लावलं जातं. उद्धव ठाकरेंच्या सभेत टिपू सुल्तानचे नारे लागतात. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातायेत. मशालीच्या रॅलीमध्ये टिपू सुल्तानच्या नावाने घोषणाबाजी होते. पाकिस्तानमधून राहुल गांधी, केजरीवाल यांच्यासाठी ट्वीट होते.
ठाकरेंच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटचा आरोपी स्टार प्रचाराक आहे. पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात. पाकिस्तानचा झेंडा फडकावून मतं मागण्याची वेळ आल्यावर राजकारणातून निवृत्ती घ्यायची वेळ आली आहे. पण हे मतांसाठी काही करायला तयार आहे.
फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
नालायकांनो मतांसाठी देशाचं आणि शहीदांचे अपमान करू नका. आम्ही उद्धव निकामांसोबत आहोत. आता मतं भेटत नाहीत, त्यामुळं यांनी लांगून चालन सुरू केलं आहे. आता तर हिंदू हृदय सम्राट बोलणं ही सोडलं आणि कॅलेंडर वर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. पाकिस्तान चे झेंडे फडकवून मतं मागायची वेळ आली असेल तर राजकारणातून बाहेर पडावे. हे सांगतात वोट जिहाद करा.
.....म्हणून बाळासाहेबांची गर्जना देणं उद्धव ठाकरेंनी बंद केली - देवेंद्र फडणवीस
शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते. मात्र अशी गर्जना काल परवा पर्यंत उद्धव ठाकरेंची ही ऐकायचो. परंतु इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांना ही गर्जना देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या, तेंव्हापासून उद्धव ठाकरेंनी ही गर्जना बंद केली.