Mahayuti Loksbaha Seat Sharing : महायुतीत जागा वाटपावरुन गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय. दरम्यान, एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगेसच्या वाट्याला कमी जागा येत असल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. कार्यकर्त्यांकडून जागा वाढवून घेण्यासाठी वरिष्ठांवर दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अजित पवारांच्या वाट्याला एक अंकी जागा 


अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे (Eknath Shinde)  आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाट्याला केवळ विनींग सीट दिल्या जातील, अशा चर्चा सुरु झाल्या. अजित पवार यांच्या वाट्याला एक अंकी आकडा येत असल्यामुळे पक्षातील नेत्यांकडून अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे जादा जागांची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अजित पवारांसह प्रमुख नेते दिल्लीला रवाना 


अजित पवार यांच्या वाटल्या केवळ 1 अंकी जागा येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे सदस्य प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आज भाजपचे केंद्रीय नेतृत्व, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होईल आणि जागा वाटपासंदर्भात ठोस निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


जागा वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर 


केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांना जागा वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय. दरम्यान, जागा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे आज (दि.8) दिल्लीला जाणार आहेत. मात्र, दुसरीकडे दिल्लीला बैठकीला जायचं की नाही याबाबत अजित पवार यांच्या गटामध्ये स्पष्टता नव्हती. मात्र, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता जागावाटपासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर, म्हणाले..